Pune : मावळच्या इंदोरी गावात कार बुडाली! कारमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ, अपघात की घातपात?

Pune : मावळच्या इंदोरी गावात कार बुडाली! कारमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ, अपघात की घातपात?
पुणे मावळमध्ये अपघात
Image Credit source: TV9 Marathi

कार नदीत बुडाली कशी असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. शिवाय गाडीत मृतदेह आढळ्यानं या प्रकरणाचं गूढ वाढलंय.

रणजीत जाधव

| Edited By: सिद्धेश सावंत

May 27, 2022 | 10:36 AM

पुणे : पुणे (Pune News) जिल्ह्यातील मावळ जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली. मावळच्या इंदोरी गावातील नदीत एक कार (Mawal Car Drown) बुडाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पाहणी केली असता, एक मृतदेह आढळून आल्याचं एकच खळबळ उडालीय. हा अपघात होता की घातपात? याचं गूढ आता वाढलंय. तळेगाव पोलीस (Talegaon Police) याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बुडालेल्या कारमध्येच एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, गाडीत आणखी कुणी होतं का? याचा आता शोध घेतला जातोय. दरम्यान, ही गाडी नेमकी बुडाली कशी असा संशयही व्यक्त केला जातोय.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी नदीत कार बुडाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मावळच्या इंदोरी गावातील इंद्रायणी नदीच्या पुलावरुन पाहणी केली असता, एका कार नदीत पूर्णपणे बुडाल्याचं निदर्शनास आलं. या कारचं फक्त टप पाण्यामध्ये तरंगत होतं. दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता या गाडीच्या आतमध्ये एक मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती.

अपघात की घातपात?

दरम्यान, कार नदीत बुडाली कशी असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. शिवाय गाडीत मृतदेह आढळ्यानं या प्रकरणाचं गूढ वाढलंय. पाण्यात बुडालेली गाडी नदीचा कठडा तोडून खाली कोसळली असावी, अशीही शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. तशा खुणादेखील पोलिसांनी पुलावर आढळून आल्याचं सांगितलं जातंय.

मात्र गाडीमध्ये एकच व्यक्ती होती की अजूनही कुणी होतं? याचा आता तपास केला जातो आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून या संपूर्ण घटनेप्रकरणी चौकशी केली जातेय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

पाहा व्हिडीओ : महत्त्वाची बातमी

हे सुद्धा वाचा

वसईतही गाडीत मृतदेह

24 तासांच्या आत गाडीत मृतदेह आढळून येण्याची ही दुसरी घटना आहे. या आधी वसईत एका जळालेल्या कारमध्ये मृतदेह आढळून आला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी मावळमधील घटनेनं गूढ वाढवलंय. दरम्यान, वसईतील जळालेल्या कारमध्ये आढळलेला मृतदेह हा शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या प्रॉपर्टीचा भाग असल्याचं चौकशीअंती समोर आलं होतं. आता मावळमधील या घटनेचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें