लॉकडाऊनमध्ये पैसे मिळेना, तो साडी नेसून थेट किन्नर बनला, संधी मिळताच महिलांचे दागिने पळवायचा, अखेर सोलापुरातून बेड्या

| Updated on: Oct 22, 2021 | 3:19 PM

पुण्यात एका विकृताने हाती काम मिळत नाही म्हणून साडी नेसून तृतीयपंथी असल्याचं नाटक करत अनेक महिलांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या ड्युबलिकेट तृतीयपंथीला बेड्या ठोकल्या आहेत.

लॉकडाऊनमध्ये पैसे मिळेना, तो साडी नेसून थेट किन्नर बनला, संधी मिळताच महिलांचे दागिने पळवायचा, अखेर सोलापुरातून बेड्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे : लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजणांची पगारकपात झाली. पण अनेकांनी या काळात पोटापाण्यासाठी स्वत:चा वेगळा व्यवसाय सुरु केला. विशेष म्हणजे अनेक लोक त्यात यशस्वी देखील झाले. काहीजण काम मिळत नसल्याने नैराश्यात गेले. त्यांनी जीवाचा आकांत केला. आक्रोश केला. पण हळूहळू त्यांना योग्य मार्ग मिळाला. प्रयत्न केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. पण काम मिळत नाही म्हणून कुणाकडून हिसकावून घेणं किंवा चोरी करणं या गोष्टीचं कधीच समर्थन केलं जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे पुण्यात एका विकृताने तर हाती काम मिळत नाही म्हणून साडी नेसून तृतीयपंथी असल्याचं नाटक करत अनेक महिलांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या ड्युबलिकेट तृतीयपंथीला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपीने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे. संबंधित आरोपीचं नाव अभिषेक रावसाहेब भोरे असं आहे. पुणे पोलिसांनी आरोपीला सोलापुरातून बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नवरात्री सणाच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिरं खुली करण्यात आली आहेत. जेजुरीत देखील खंडेराय महाराजांचं तीर्थक्षेत्र भाविकांसाठी खुले झालं आहे. जेजुरीतील लोककलाकारांनी त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील सुरुवात केली आहे. या दरम्यान जेजुरीच्या एका महिला कलाकाराला सहकलाकाराची गरज होती. तिने फेसबुकवर सर्च केल्यानंतर तिला रानी किन्नर नावाचं एक फेसबुक अकाउंट मिळालं. महिलेने रानी किन्नरशी संपर्क केला. विशेष म्हणजे रानी किन्नर कलाकार म्हणून काम करण्यास तयारही झाली. संबंधित महिलेने रानी किन्नरला जेजुरीला बोलावलं, तसेच आपल्या कार्यक्रमात तिला सह-कलाकार म्हणून घेण्याचाही निर्णय घेतला.

आरोपी दीड तोळे सोनं घेऊन पळाला

आरोपी अभिषेक हा किन्नर असल्याचं नाटक करत दोन दिवस फिर्यादि महिलेसोबत राहिला. पण तिसऱ्या दिवशी किन्नरचं नाटक करणाऱ्या आरोपीने अखेर तक्रारदार महिलेचे दीड तोळे सोने आणि अन्य दागिने, तसेच सहा हजारांची रोख रक्कम घेऊन धूम ठोकली. आरोपी रात्रीच्या वेळी पळाला. त्यामुळे तो पळून जात असताना त्याची कुणालाही चाहूल लागली नाही.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा महिलेला जाग आली तेव्हा तिने रानी किन्नरचा शोध घेतला. पण ती कुठेही दिसत नव्हती. तसेच तिचे घरातील दागिने आणि पैसेदेखील गायब होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची जाणीव महिलेला झाली. तिने तातडीने जेजुरी पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तपास केला असता आरोपी सोलापुरात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांनी एक टीम सोलापुरात पाठवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला सोलापुरातून बेड्या ठोकल्या. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. या आरोपीला सासवड कोर्टात हजर केलं असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

पत्नीसोबत वादानंतर पतीची आत्महत्या, घाटात झाडाला गळफास, पुण्यात खळबळ

दारु पिण्यावरुन हॉटेल मालकाशी वाद, दुसऱ्या दिवशी येऊन हल्ला, कर्मचाऱ्याला दोघांनी खंजीर भोसकला