पत्नीसोबत वादानंतर पतीची आत्महत्या, घाटात झाडाला गळफास, पुण्यात खळबळ

पत्नीसोबत झालेल्या वादानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात घडला आहे. खेड घाटात झाडाला गळफास घेऊन पतीने आपल्या आयुष्याची अखेर केली.

पत्नीसोबत वादानंतर पतीची आत्महत्या, घाटात झाडाला गळफास, पुण्यात खळबळ

पुणे : पत्नीसोबत झालेल्या वादावादीनंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. झाडाला गळफास घेऊन पतीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पुणे जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला.

काय आहे प्रकरण?

पत्नीसोबत झालेल्या वादानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात घडला आहे. खेड घाटात झाडाला गळफास घेऊन पतीने आपल्या आयुष्याची अखेर केली.

जयदीप काळूराम जैद असे 40 वर्षीय पतीचे नाव आहे. घटनास्थळी खेड पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. याबाबतची माहिती खेड पोलिसांनी दिली आहे.

चंद्रपुरात पत्नीची हत्या करुन पतीचा झाडाला गळफास

याआधी, पत्नीची हत्या करुन पतीने झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली होती. अंगणातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह आढळला होता, तर पत्नी घरात जखमी अवस्थेत सापडली होती. मात्र उपचारादरम्यान तिनेही अखेरचा श्वास घेतला. पतीने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे एकच खळबळ उडाली होती.

नेमकं काय घडलं?

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील आमराई वॉर्ड परिसरात ऑगस्ट महिन्यात ही घटना उघडकीस आली. सुरज माने (वय 28 वर्ष) आणि रत्नमाला माने (वय 25 वर्ष) असं मयत पती-पत्नीचं नाव आहे. सकाळी घराच्या अंगणातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सुरजचा मृतदेह आढळला होता, तर घरात रत्नमाला जखमी अवस्थेत सापडली होती. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान रत्नमालाचा देखील मृत्यू झाला.

पत्नीला मारहाणीनंतर पतीचा गळफास

प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून सुरजने आदल्या रात्री पत्नीला जबर मारहाण केली होती. मारहाणीत पत्नी जखमी झाल्याने मंगळवारी सकाळी गळफास घेऊन सुरजने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर पतीच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे रत्नमालाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जखमांवरुन स्पष्ट झालं.

संबंधित बातम्या :

जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू, 28 वर्षीय पतीचा अंगणातील झाडाला गळफास

विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित नर्सचा ओढणीने गळफास

मायलेकीचे एकाच प्रियकराशी प्रेमसंबंध, पाळत ठेवणाऱ्या तरुणाची हत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI