Pune crime : पुण्यात दारुसाठी होती धाड,सापडले घबाड, नोटा मोजताना अधिकारी दमले

पुणे पोलिसांना अवैध दारु विक्री संदर्भातील टीप मिळाली होती. म्हणून पोलिसांनी येथे छापा टाकला. परंतू नंतर जे घबाड समोर आले त्याला पाहून पोलिसही हादरले.

Pune crime : पुण्यात दारुसाठी होती धाड,सापडले घबाड, नोटा मोजताना अधिकारी दमले
Pune crime
| Updated on: Dec 26, 2025 | 9:33 PM

Pune News : पुण्यातून एक अशी बातमी आली आहे जी ऐकून इन्कम टॅक्स विभागही अलर्ट झाला आहे. पुण्याच्या कोंढवा येथे पुणे पोलिसांच्या टीमने अवैध दारु साठ्याच्या टीपवरुन धाड टाकली. परंतू कारवाई करताना तेथे अक्षरश: कुबेराचा खजाना सापडला. घराच्या कपाटाच्या आत नोटांची अशी बड्डले सापडली की पोलिसांना नोटा मोजण्यासाठी मशिन मागवावी लागली.

काय झाले नेमके ?

कोंढवा पोलिसांना गुप्त बातमी मिळाली होती की काकडे वस्तीत एका घरात अवैधरित्या दारु विक्रीचा धंदा चालतो. क्राईम ब्रँचच्या टीमने गुरुवारी तेथे धाड टाकली तर व्हिस्की, रम आणि डब्यात भरलेली ७० लिटरची दारु सापडली. सुरुवातील पोलिसांना २ लाख रुपयांची दारु आणि १.४१ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. त्यामुळे एकूण ३ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल सुरुवातीला जप्त केला. परंतू असली खेळ नंतर सुरु झाला.

बेडरुमच्या कपाटात होते १ कोटी रुपये

पोलिसांना शंका आली धंदा जेवढा दिसतोय त्याहून जास्त आहे. जेव्हा पोलिसांनी बेडरुमची झडती घेतली तेव्हा तेथे एक जुने कपाट आहे. कपाटातील विविध कप्प्यात झडती घेतली तर पोलिसांचे डोळे विस्फारले. कपाटात नोटा कोंबून भरल्या होत्या. या नोटा मोजायला मशिन मागवण्यात आली. मोजायला सुरुवात केली तर हा आकडा १,००,८५,९५० रुपयांपर्यंत ( एक कोटी रुपयांहून अधिक ) पोहचला. दारुच्या एका छोट्या व्यवसायातून इतकी कमाई पाहून पोलिस देखील चक्रावले.

या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींची नावे अमर कौर ( उर्फ मादरी कौर ) दीलदार सिंह आणि देवश्री जुन्नी सिंह अशी आहेत. पोलिस आता हा छडा लावत आहेत की अखेर अवैध दारु विक्रीतून इतकी मोठी रक्कम कशी काय जमा केली गेली. या टोळीचा आणखीन काही धंदा आहे काय याचा तपास केला जात आहे.

येथे पाहा व्हिडीओ –


पुणे पोलिस आता या आरोपींच्या फायनान्शियल नेटवर्कचा तपास करत आहे. पोलिसांना संशय आहे या अवैध दारु धंद्याचे धागेदोरे कोणा बड्या नेटवर्कशी जोडलेले असू शकतात. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुणे पोलिसांनी अलिकडेच ३.४५ कोटी रुपयांच्या ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड केला होता. त्यामुळे शहरातील अवैध कारवाई विरुद्ध पोलिसांच्या सुरु असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन’ची खूप चर्चा होत आहे.