पुणे सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने 5 जणांना चिरडलं; तीन जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

| Updated on: Nov 27, 2021 | 6:59 AM

कुरकुंभ गावच्या हद्दीत अपघात झाल्याची माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटना स्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकेतून दौंडच्या रुग्णालायत पाठवलं.

पुणे सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने 5 जणांना चिरडलं; तीन जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
पुणे सोलापूर महामार्गावर अपघात
Follow us on

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune Solapur Highway) कुरकुंभ गावच्या हद्दीमध्ये पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पाच जणांना चिरडल्याची घटना घडलीय. अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर रित्या जखमी झालेत.अज्ञात वाहन पुणे-सोलापूर महामार्गावरुन पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने चालले होते. अपघाताची माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांना वाहतूक सुरळीत केली आहे.

अपघात कसा झाला?

पुणे- सोलापूर हायवेवर कुरकुंभ गावच्या हद्दीत काही जण महामार्ग ओलांडत होते. याच दरम्यान महामार्ग क्रॉस करताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.तर दोघा जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहनाचा शोध सुरु

शुक्रवारी सांयकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळाली होती. यामध्ये पाच जण जखमी झाले होते. यामधील तीन जण गंभीर जखमी त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या सर्वांना तात्काळ रुग्णवाहिका बोलवून दौंड येथी रुग्णालयात पाठवलं होतं. ज्या वाहनानं अपघात झाला त्या वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनानं रस्ता ओलांडणाऱ्यांना उडवलं. अपघात करुन तो वाहनचालक गायब झाला आहे. तो थांबलेला नाही,असं दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद गुघे यांनी सांगितलं आहे.

पोलिसांकडून वाहतूक सुरळीत

कुरकुंभ गावच्या हद्दीत अपघात झाल्याची माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटना स्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकेतून दौंडच्या रुग्णालायत पाठवलं. पोलिसांनी यानंतर पुण्यावरुन सोलापूरला जाणारी वाहतूक सुरळीत केली. ज्या वाहनानं रस्ता ओलांडणाऱ्यांना उडवलं त्या वाहनाचा शोध सुरु असल्याचं पोलिसांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

कोणीही घाबरू नका, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही, धनंजय मुंडे यांचं परळीकरांना आवाहन

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी

Pune Solapur Highway accident near Daund kurkumbh three died two injured