AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणीही घाबरू नका, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही, धनंजय मुंडे यांचं परळीकरांना आवाहन

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची यांनी परळी येथील जोतिर्लिंग मंदिराला उडवून देण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात तातडीनं कारवाई करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील भाविकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोणीही घाबरू नका, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही, धनंजय मुंडे यांचं परळीकरांना आवाहन
Dhananjay Munde Parali Temple
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 6:24 AM
Share

बीड: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची यांनी परळी येथील जोतिर्लिंग मंदिराला (Parali Temple Threat Letter) उडवून देण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात तातडीनं कारवाई करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील भाविकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. याशिवाय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी आणि बीड पोलीस अधीक्षक आणि दहशतवाद विरोधी पथकास माहिती दिल्याचं धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे कळवलं आहे.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये “श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी, बीड एसपी, तसेच दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलीस खाते याबाबत त्वरित अ‌ॅक्शन घेत आहे.

कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैद्यनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. 50 लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे गजाआड होतील, असं मुंडे म्हणालेत.

धनंजय मुंडे यांचं ट्विट

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. धमकी देणारं पत्र नांदेडहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. पत्राचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मंदिराच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

50 लाखांची मागणी

मंदिर उडवून देण्याची धमकी नेमकी कोणी दिली याविषयी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र, 50 लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवू असं, या पत्रात सांगण्यात आलं आहे. मंदिर उडवून देण्याची धमकी मिळाली असल्यानं मंदिर प्रशासन चांगलेच धास्तावले आहे.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

परळी शहर पोलीस स्टेशनला धमकीचं पत्र मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या:

परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्टवर, पोलिसांचा बंदोबस्त तत्काळ वाढवला

धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणूक : भाजपचे अमरिश पटेल बिनविरोध, काँग्रेसच्या गौरव वाणींचा उमेदवारी अर्ज मागे

Dhananjay Munde said people of Parali no need to panic after threat letter received by Parali Police will take necessary action on it

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.