परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्टवर, पोलिसांचा बंदोबस्त तत्काळ वाढवला

जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी आलीय. या धमकीमुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. नांदेडहून हे पत्र आल्याचे सांगण्यात येत असून या मंदिरातील पोलीस बंदोबस्त तत्काळ वाढवण्यात आला आहे.

परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्टवर, पोलिसांचा बंदोबस्त तत्काळ वाढवला
parli vaijnath

बीड : जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी आलीय. या धमकीमुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. नांदेडहून हे पत्र आल्याचे सांगण्यात येत असून या मंदिरातील पोलीस बंदोबस्त तत्काळ वाढवण्यात आला आहे.

50 लाख द्या, अन्याथा मंदिर उडवू

मिळालेल्या माहितीनुसार परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. हे पत्र नांदेडून आले आहे. या पत्रामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. धमकी नेमकी कोणी दिली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, 50 लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवू असं, या पत्रात सांगण्यात आलंय. या धमकीमुळे मंदिर प्रशासन चांगलेच धास्तावले आहे.

पोलिसांनी बंदोबस्त वाढवला, तपास सुरु 

दरम्यान, याबाबत परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच धमकीचे पत्र आल्यानंतर मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात  आलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या:

धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणूक : भाजपचे अमरिश पटेल बिनविरोध, काँग्रेसच्या गौरव वाणींचा उमेदवारी अर्ज मागे

MPSC Chairman | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती

15 डिसेंबरपसून भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुन्हा सामान्य होणार, मात्र नवीन कोविड स्ट्रेनमुळे ‘या’ 14 देशांना वगळलं


Published On - 11:46 pm, Fri, 26 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI