Pune Accident : पुणे सातारा महामार्गावर विचित्र अपघात, आठ गाड्या एकमेकांवर धडकल्या

| Updated on: Jun 26, 2022 | 11:16 PM

पुणे-सातारा महामार्गावर पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने चाललेल्या एका गाडीने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागून वेगात येणाऱ्या आठ गाड्या एकमेकांवर धडकत गेल्या. महामार्गावरील वरवे गावाजवळ ही विचित्र घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुढच्या वाहनचालकाने अचानक ब्रेक का मारला हे अद्याप कळू शकले नाही.

Pune Accident : पुणे सातारा महामार्गावर विचित्र अपघात, आठ गाड्या एकमेकांवर धडकल्या
पुणे सातारा महामार्गावर विचित्र अपघात
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे सातारा महामार्गावर विचित्र अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात आठ गाड्या (Vehicles) एकमेकांवर आदळल्या. महामार्गावरील वरवे गावाजवळ हा विचित्र अपघात झाला आहे. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येताना सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाड्यांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान (Loss) झाले आहे. पुढे असणाऱ्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने, त्या मागून येणाऱ्या गाड्या एका मागोमाग एक अशा प्रकारे धडकल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

पुणे-सातारा महामार्गावर पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने चाललेल्या एका गाडीने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागून वेगात येणाऱ्या आठ गाड्या एकमेकांवर धडकत गेल्या. महामार्गावरील वरवे गावाजवळ ही विचित्र घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुढच्या वाहनचालकाने अचानक ब्रेक का मारला हे अद्याप कळू शकले नाही. महामार्गावर गाड्यांचा वेग अधिक असतो. यामुळे सर्व गाड्या वेगात एकमेकांवर येऊन धडकल्याने गाड्यांचे नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चंद्रपूरमध्ये खासगी ट्रॅव्हलच्या अपघातात तीन गंभीर जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात भरधाव ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवासी गंभीर जखमी झाले. मूल-चामोर्शी ते नागपूर खाजगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात अन्य काही किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात मूल-चामोर्शी मार्गावरील योग राईस मिलजवळ सकाळी घडली. या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर खाजगी प्रवासी वाहतूक सुरू आहे. चामोर्शीवरुन मूल मार्गे नागपूर जाणारी ही बस बाबा ट्रॅव्हल्सची होती. हा अपघात मूल शहरापासून 5 किमी अंतरावर झाला आहे. या वाहनातून 12 प्रवासी वाहतूक करीत होते. स्थानिक नागरीक आणि मूल पोलिसांनी जखमी प्रवाशांना मूल उपजिल्हा रुग्णालयात पोहचविण्यासाठी मदत केली. (Strange accident on Pune-Satara highway, eight vehicles collided with each other)

हे सुद्धा वाचा