तब्बल 19 दिवसांनी सापडला वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह, सोन्याच्या मोहापोटी मित्राने केली होती हत्या

| Updated on: Nov 04, 2022 | 9:21 PM

पोलीस चौकशीत आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गवरील सारोळे येथील नीरा नदीपात्रात टाकल्याची माहिती पोलिसांना दिली होता. त्यानंतर नीरा नदीत मृतदेहचा शोध घेतला जात होता.

तब्बल 19 दिवसांनी सापडला वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह, सोन्याच्या मोहापोटी मित्राने केली होती हत्या
तब्बल 19 दिवसांनी सापडला वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : दागिन्यांच्या मोहापोटी हत्या करण्यात आलेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधण्यास तब्बल 19 दिवसांनी रेस्क्यू टीमला यश आले आहे. निलेश वरघडे असे मयत वास्तुशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. मित्रानेच निलेशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत फेकला होता. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दिपक नरळे आणि त्याचा साथीदार रणजित जगदाळे यांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली होती.

पोलीस चौकशीत आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गवरील सारोळे येथील नीरा नदीपात्रात टाकल्याची माहिती पोलिसांना दिली होता. त्यानंतर नीरा नदीत मृतदेहचा शोध घेतला जात होता.

16 ऑक्टोबरला झाली होती निलेशची हत्या

निलेश वरघडे हे वास्तुशास्त्र सल्लागार होते. 16 ऑक्टोबरला मित्र दिपक नरळे याने निलेश यांना पुण्यातील नऱ्हे येथे एका औषध दुकानात पूजेसाठी नेले होते. मात्र निलेश यांच्या अंगावरील दागिने पहिल्यानंतर दिपकने त्यांना लुटण्याचा डाव रचला.

आधी बेशुद्ध केले मग हत्या केली

आरोपी दिपक आणि त्याचा साथीदार रणजित यांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले. ते बेशुद्ध पडल्यानंतर गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गावरच्या नीरा नदीत टाकून दिला.

पत्नीने मिसिंगची तक्रार दिल्यानंतर पोलीस तपासात गुन्हा उघड

दरम्यान, निलेश हे घरी परत न आल्याने रुपाली रुपेश वरघडे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत आरोपी दिपक याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

आरोपींनी हत्येची कबुली दिल्यानंतर गेल्या 18 दिवसांपासून निलेश यांच्या मृतदेहचा शोध स्थानिक रेस्क्यू टीममार्फत नीरा नदीत घेण्यात येत होता. अखेर 19 व्या दिवशी निलेश यांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय.

पोलिसांनी आरोपींकडून याआधीच कार, दोन दुचाकी, सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण 19 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.