TET Exam scam | आरोपी घोटाळा करताना वापरायची ही Modus operandi.. ; पोलिसांनी उघड केली माहिती

| Updated on: Dec 17, 2021 | 6:42 PM

जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचा समावेश होता. त्याच्याकडं अधिक तपास करत असताना टीईटी" परीक्षेतही घोटाळा केला आल्याचे समोर आलं.

TET Exam scam | आरोपी घोटाळा करताना वापरायची ही Modus operandi.. ; पोलिसांनी उघड केली माहिती
Follow us on

पुणे – आरोग्य भरती, म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी आता `टीईटी” परीक्षेतला घोटाळा उघड केलाय. आरोग्य भरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा तपास सुरु असतानाच म्हाडाच्या परीक्षेतही घोटाळा होण्याची कुणकुण लागली.त्यानुसार तापसाची चक्र हालवत पुणे पोलिसांनी म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या सहाजणांना अटक केली. त्यामध्ये जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचा समावेश होता. त्याच्याकडं अधिक तपास करत असताना टीईटी” परीक्षेतही घोटाळा केला आल्याचे समोर आलं.

असा करायचे घोटाळा
या परीक्षेचे कॉन्ट्रॅक्ट जी ए सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीला देण्यात आले आहोत. परीक्षा घेताना ज्या उमेदवारांकडून पैसे घेतलेले असायचे . त्यांना तुम्ही पेपर लिहू नका असे सांगितले जायचे. त्यानंतर पेपरचे स्कॅनिंग करताना त्यात मार्क भरायचे. यासगळ्या गोष्टी केल्यानंतरही एखादा उमेदवार राहिला असेल तर त्याला सांगायचे की तुम्ही पेपर री -चेकिंगला टाका असे सांगण्यात येत होते. पुन्हा त्याचे मार्क भरायचे. अश्या प्रकारे बनावट मार्क भरले जायचे. परीक्षेत पास  करण्यासाठी साधारण ३५ हजार ते १ लाखांपर्यंतची रक्कम घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षांच्या टप्प्यानुसार ठरत होती रक्कम

घराच्या झडतीत सापडले इतके रूपये

‘ टीईटी ‘ परीक्षेत घोटाळा करत असताना आरोपींनी जवळपास साडे चार कोटी रुपये जमावल्याचा अंदाज होता. पोलिसांनी अटक केलेल्या महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घराची झडती घेण्यात आली. यामध्ये 90 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने, फिक्स डिपॉझिटच्या पावत्याही सापडलया आहेत. यामध्ये आणखी काहीजणांची लिंक लागण्याची शक्यता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्त यांनी व्यक्त केली आहे.

जॅकलिन, नोरा, शिल्पासह ‘या’ 12 अभिनेत्रींसोबत सुकेशचे कोल्ज कनेक्शन? ईडीसमोर खळबळजनक खुलासे

Asian Championship: हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला लोळवलं, हरमनप्रीत-आकाशदीप ठरले हिरो

AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 2: ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा, इंग्लंडची नाजूक अवस्था, 456 धावांनी पिछाडीवर