AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 2: ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा, इंग्लंडची नाजूक अवस्था, 456 धावांनी पिछाडीवर

आज दुसऱ्या दिवसाचा खेळ नियोजित वेळेआधीच संपवण्यात आला. दिवसाच्या अखेरच्या सत्रात वीजा चमकून ढगाळ वातावरण झाल्याने खेळ थांबवावा लागला.

AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 2: ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा, इंग्लंडची नाजूक अवस्था, 456 धावांनी पिछाडीवर
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 6:05 PM

मेलबर्न: अ‍ॅडलेड येथे ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये (AUS vs ENG) अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ नियोजित वेळेआधीच संपवण्यात आला. दिवसाच्या अखेरच्या सत्रात वीजा चमकून ढगाळ वातावरण झाल्याने खेळ थांबवावा लागला. दिवसअखेरीस इंग्लंडची अवस्था नाजूक आहे. निराशाजनक सुरुवातीनंतर इंग्लंडच्या दोन बाद 17 धावा झाल्या आहेत.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 473 धावा केल्या. इंग्लंड 456 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार जो रुट (5) आणि डेविट मलान (1) धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा भेदक गोलंदाज मिचेल स्टार्कने रॉरी बन्सला (4) धावांवर बाद केले. डेब्यु करणाऱ्या मायकल नीसरने हसीब हमीदला (6) धावांवर बाद केले.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने नऊ विकेट पडलेल्या असताना पहिला डाव 473 धावांवर घोषित केला. मार्नस लाबुशेनने (103) दिवसाच्या सुरुवातीला शतक झळकावले. ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव स्मिथचं शतक हुकलं पण त्याने 93 धावा केल्या. डावाच्या अखेरीस मिचेल स्टार्क आणि नीसरने वेगाने धावा करुन ऑस्ट्रेलियाला 473 धावसंख्येपर्यंत पोहोचवले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक तीन आणि जेम्स अँडरसनने दोन विकेट घेतल्या.

आधीच इंग्लंडचा संघ मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. काल पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने फक्त दोन विकेट गमावून 221 धावा केल्या होत्या. इंग्लिशन गोलंदाज वॉर्नर-लाबुशेन जोडीसमोर निष्प्रभ ठरले होते. ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटी प्रमाणे इथेही डेविड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेनमध्ये शानदार भागीदारी झाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी केली होती. वॉर्नरचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. त्याने 95 धावांच्या खेळीत 11 चौकार लगावले. वॉर्नरला स्टोक्सने बाद केले.

संबंधित बातम्या: IND VS SA: कॅप्टन कोहली २९ वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार, गांगुलीला विश्वास India south Africa Tour Video : जोहान्सबर्गला जाताना विमानात विराटने इशांत शर्माला डिवचलं विराट, गेलला जमलं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने करुन दाखवलं, बाबर म्हणाला….

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.