AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad crime| सांगवीतील योगेश जगताप हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक ; वर्चस्व वादातून केली हत्या

घटनेच्या दरम्यान योगेश दत्त जयंती निमित्त सुरु होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पाहत असताना गणेश मोटे व अश्विन चव्हाण तेथे आले. त्यांनी ' योग्या तुला आता जिवंत ठेवत नाही म्हणत पिस्तूल घेऊन त्यांच्यामागे धावले, त्यांच्या हातात पिस्तूल बघून योगेश यांनी पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी तब्बल सहा गोळया झाडल्या

Pimpri Chinchwad crime|  सांगवीतील योगेश जगताप हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक ; वर्चस्व वादातून केली हत्या
crime
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 19, 2021 | 3:57 PM
Share

पिंपरी- सांगवीतील काटेपुरम चौकात व्यवसायिक योगेश जगताप यांची गोळ्या घालत हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेतील दोन आरोपींना पकडण्यात सांगवी पोलिसांना यश आले आहे. अक्षय केंगले आणि गणेश ढमाले अशी अटक करण्यात आलेलया आरोपींची नावे आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.

नेमकं काय घडले?

काल शनिवार (दि. 18) रोजी सांगवीतील काटेपुराम चौकात सकाळी साडेदहा व्यवसायिक योगेश जगताप यांच्यावर दोन जअज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या हल्ल्यात व्यावसायिक योगेश यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी झाडलेल्या सहा गोळ्यातील दोन गोळ्या त्यांना लागल्या यात जगताप गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या फौजफाट्यासह पोलीस घटना स्थळावर हजर झाले. आरोपी यांनी जगताप यांच्यावर जुन्या भांडणाचा राग उकरून काढत हल्ला केला. यामध्ये पोलिसांनी गणेश मोटे व अश्विन चव्हाण या दोघांसह 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघाना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हत्या

सांगवीतील त्या परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने संगनमत करुन हल्ल्याचा कट रचला. घटनेच्या दरम्यान योगेश दत्त जयंती निमित्त सुरु होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पाहत असताना गणेश मोटे व अश्विन चव्हाण तेथे आले. त्यांनी ‘ योग्या तुला आता जिवंत ठेवत नाही म्हणत पिस्तूल घेऊन त्यांच्यामागे धावले, त्यांच्या हातात पिस्तूल बघून योगेश यांनी पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी तब्बल सहागोळया झाडल्या. त्यातील दोन गोळ्या लागून योगश गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी आणखी एकाला पिस्तुलाचा धाक दाखवत त्याची दुचाकी घेतली व तेथून पळ काढला.

St. Thomas Church| नाशिकच्या सेंट थॉमस चर्चमध्ये फादरने बिशपसमोर घेतले पेटवून; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

ठाण्यात राष्ट्रवादीचा शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; बोम्मईंच्या प्रतिमेला जोडे मारो!

बैलगाडा शर्यतीवर बंदी तरीही पठ्ठ्याने सांभाळले 32 बैलं, बंदी उठताच केला जल्लोष; हिंगोलीच्या शेतकऱ्याची कथाच न्यारी

Follow Us
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं...
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं... कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने मोठी खळबळ
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया,
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार,
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार, चक्क... धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी; थेट...
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... पुन्हा बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य