‘कुठे वाच्यता केलीस, तर मारून टाकेन’ अशी धमकी देत ९ वर्षाच्या पुतणीवर काकाच करत होता अत्याचार

| Updated on: Nov 30, 2021 | 10:44 AM

पीडित अल्पवयीन मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचारीची माहिती इमारतीतील शेजारच्या महिलेला सांगितली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. पीडित मुलीच्या वडिलांचा ८ वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यानंतर मुलीचा काकाच या दोन बहीण भावंडांसह आईचा सांभाळ करत होता.

कुठे वाच्यता केलीस, तर मारून टाकेन अशी धमकी देत ९ वर्षाच्या पुतणीवर काकाच करत होता अत्याचार
कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र करुन मारहाण
Follow us on

पुणे – नात्याला काळिमा फासणारी घटना शहरात उघडकीस आली आहे. आई- वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावा-बहीणीचा  सांभाळ करणारा काकाच हैवान निघाला. सांभाळ करण्याच्या नावाखाली ९ वर्षाच्या पुतणीवर काका अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रोडवरील वडगाव येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या काकाला अटक केली आहे.

असा झाला उलगडा
पीडित अल्पवयीन मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचारीची माहिती इमारतीतील शेजारच्या महिलेला सांगितली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. पीडित मुलीच्या वडिलांचा ८ वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यानंतर मुलीचा काकाच या दोन बहीण भावंडांसह आईचा सांभाळ करत होता. त्यानंतर मागील काही वर्षात मुलीच्या आईचा व काकीचाही मृत्यू झाला. त्यामुळे घरात केवळ काकासह ही दोन भावंडे राहत होती.

मारून टाकण्याची दिली धमकी
काकाने १३ डिसेंबर २०१८ला सर्वात प्रथम यामुलीवर लैंगिक अत्याचार केला. मात्र याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुझ्यासह तुझ्या भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर क्रूर काका सातत्याने तिच्यावर अत्याचार करू लागला. मात्र मुलगी ते सहन करत राहिली. या अखेर त्रास शहांना झाल्याने २५ नोव्हेंबरला मुलीने धाडस करत शेजारच्या महिलेलला घडत असलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. हा प्रकार १३ डिसेंबर २०१८ पासून २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत घडत होता.

घरांसाठी म्हाडा पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील जमीनी ताब्यात घेणार; संबंधित विभागाकडे प्रस्ताव दाखल

Food : नाश्त्यासाठी घरच्या घरी तयार करा खास ढोकळा, जाणून घ्या रेसिपी!

आता असंघटीत क्षेत्रातील मजुरांनाही मिळणार पेन्शन; ‘असे’ असेल योजनेचे स्वरूप