Unnatural sexual abuse| पुण्यात दहा वर्षाच्या मुलावर दोन मुलांनी केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

घटनेच्या दिवशी त्यांनी पीडित मुलाला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेने घाबरलेल्या मुलाने आपल्या सोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली.

Unnatural sexual abuse| पुण्यात दहा वर्षाच्या मुलावर दोन मुलांनी केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 5:08 PM

पुणे- शहरातील वारजे-माळवाडी परिसरात 10 वर्षीय मुलावर 14 वर्षांच्या मुलांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलाच्या ओळखीच्या मुलांनी हा त्याचार केला आहे. या प्रकरणी वारजे पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या घटनेतील आरोपी अल्पवयीन असून याबाबत तपास सुरु केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

अशी घडली घटना
पीडित मुलगा 10 वर्षाचा असून, आरोपी मुले ही त्याच्या ओळखीची होती. घटनेच्या दिवशी त्यांनी पीडित मुलाला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेने घाबरलेल्या मुलाने आपल्या सोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर पोलिसानी तात्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

पालकांनी सतर्क राहावे
मागील काही काळापासून शहरात महिलांवरील अत्याचाराबरोबरच लहान मुलांवरील वाढते अत्याचार पोलिसांसाठी डोके दुखी ठरत आहेत. लहान मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन वाढीस लागले आहे. यातून अनेकदा या प्रकारच्या घटना घडतं असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी मुलांचे समूपदेशन, गुड टच बॅड टचची ओळख याविषयी पालकांनी आपलया मुलांच्या सोबत संवाद साधला पाहिजे असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.

Nashik rape| केवढे हे क्रौर्य…चिमुरडीच्या नरडीवर सुरी ठेवून आईवर बलात्कार, नाशिक हादरले!

Girl Suicide | लैंगिक छळाला कंटाळून अकारावीतील मुलीनं जीव दिला! सुसाईड नोटमुळे गुंता वाढला

Realme ते Samsung, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार 5G स्मार्टफोन