शनिवारी सकाळी ‘या’ 5 गोष्टी कराच, मिळेल शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल, काय सांगतं शास्त्र?
शनिवारी शनिदेवाची पूजा केली पाहिजे अशी श्रद्धा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, शनिदेव व्यक्तीच्या कर्मांनुसार फळ देतात. म्हणून असं सांगतात की, शनिवाी सकाळी काही धार्मिक गोष्टी केल्याच पाहिजे, तर जाणून घ्या कोणत्या आहे त्या गोष्टी...

हिंदू धर्मात पूजेला फार महत्त्व आहे. प्रत्येकाने देवाची पूजा आणि प्रार्थना केलीच पाहिजे, असं सांगितलं जातं. त्यामध्ये, शनिवार हा विशेषतः न्यायाची देवता असलेल्या शनिदेवाला समर्पित आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, शनिदेव व्यक्तीच्या कर्मांनुसार फळ देतात. म्हणूनच या दिवशी शनिदेवाची पूजा करणे, गरिबांना मदत करणे आणि दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. भक्तांचा असा विश्वास आहे की शनिवारी सकाळी काही विशेष गोष्टी केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो. असेही मानले जाते की यामुळे मनाला शांती मिळते आणि जीवनातील समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया शनिवारी सकाळी करण्यासारख्या पाच गोष्टी कोणत्या आहेत.
शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर शांत मनाने शनिदेवाचे स्मरण करावे. पूजेदरम्यान, भक्तिभावाने ‘ओम शम शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने मनाला शांती मिळते, असा भक्तांचा विश्वास आहे.
शनिवारी रावीच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. सकाळी स्नान करून रावीच्या झाडाला पाणी अर्पण करण्याची आणि त्याच्याजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याची परंपरा आहे. असे केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि सर्व संकटे दूर होतात, असा विश्वास आहे.
शनिवारी भगवान हनुमानाची पूजा करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन देवाला वंदन करावं. परंपरेनुसार, केशर आणि मोगऱ्याचं तेल अर्पण करून हनुमान चालिसेचं पठण करावं. भक्तांचा असा विश्वास आहे की भगवान हनुमानाची पूजा केल्याने शनीच्या प्रभावातून मुक्ती मिळते.
शनिवार हा दान करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. या दिवशी गरजू लोकांना काळे तीळ, काळी मसूर, ब्लँकेट, चपला आणि अन्न यांसारख्या वस्तू दान करता येतात. प्रत्येकाने विशेषतः गरीब, वृद्ध आणि गरजू लोकांना आपल्या क्षमतेनुसार शक्य तितकी मदत केली पाहिजे. वडीलधाऱ्यांच्या मते, कोणताही गर्व न बाळगता आणि निस्वार्थ भावनेने दान करणं महत्त्वाचं आहे.
शनिवारी कावळ्यांना खाऊ घालण्याची परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, कावळे हे शनि देवाशी संबंधित आहेत. त्यामुळे, या दिवशी कावळ्यांना धान्य किंवा अन्न खाऊ घालणं शुभ मानलं जातं. यासोबतच, गायी, कुत्रे, इतर प्राणी आणि पक्ष्यांनाही खाऊ घालता येते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
