Nashik rape| केवढे हे क्रौर्य…चिमुरडीच्या नरडीवर सुरी ठेवून आईवर बलात्कार, नाशिक हादरले!

महिलेच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर कलम कलम 376 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik rape| केवढे हे क्रौर्य...चिमुरडीच्या नरडीवर सुरी ठेवून आईवर बलात्कार, नाशिक हादरले!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 4:49 PM

नाशिकः माणुसकीला नख लावणाऱ्या घटनांमुळे सध्या नाशिक जिल्हा हादरून गेलाय. त्यात आता लहान मुलीच्या नरडीवर चक्क चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी गुन्हा करून सहीसलामत धूम ठोकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सातपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या विचित्र घटनेमुळे पोलीस खाते सुद्धा हादरून गेले आहे.

आईला धरले वेठीस…

एरवी शांत असणारे नाशिक गेल्या दोन महिन्यांपासून विविध गुन्हेविषयक घटनांनी पार ढवळून निघाले आहे. आता नाशिकमधल्या सातपूर परिसरात अशीच एक अत्याचाराची घटना उघड झाली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी आझाद शेखने एका महिलेला धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. संशयिताने पीडितेवर नाशिकच्या त्र्यंबकरोडवरील एका लॉजिंग हॉटेलमध्ये 17 डिसेंबर रोजी रात्रभर बलात्कार केला. पीडितेने नकार दिल्यास तो तिच्या लहान मुलीच्या नरडीवर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी द्यायचा आणि बलात्कार करायचा, असा प्रकार समोर आला आहे.

मित्राच्या घरीही अत्याचार

आझाद शेखने महिलेवर सतरा डिसेंबर रोजी रात्रभर एका हॉटेलमध्ये बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्या महिलेला आपल्या मित्राच्या घरी नेले. तिथेही त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. त्यानंतर तिला सोडून दिले आणि नाशिक सोडून पळून जायचा प्रयत्न केला. त्यासाठी तो रेल्वेस्टेशनवर गेला. तिथे बाहेरगावी जाण्यासाठी तिकीट काढले. याची कुणकुण सातपूर पोलिसांना लागली. त्यांनी तातडीने नाशिकरोड परिसरातील रेल्वेस्टेशन गाठले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर कलम कलम 376 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

कुठे सुरू आहे प्रवास…

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मग ते बनावट नोटाप्रकरण असो की, एकाच आठवड्यात झालेले तीन खून असो की जिल्ह्यात गेल्याच महिन्यात पडलेले तीन दरोडे. यामुळे नाशिकच्या शांत प्रतिमेला तडा गेला आहे. पोलिसांनी सक्रिय राहून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात. नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. शहराची अशीच प्रतिमा राहिली, तर उद्योजक इकडे फिरकणारही नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.

इतर बातम्याः

No water in Nashik| नाशिकमध्ये बुधवारी कोणत्या भागात पाणीपुरवठा नाही, घ्या जाणून…

पोटात पाप म्हणूनच म्हणूनच मैं जेल में जाऊंगाचा आरडाओरडा, सोमय्यांचे मलिकांवर शरसंधान; चोरीचा माल वापस किया म्हणत राऊतांवर टीका

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.