No water in Nashik| नाशिकमध्ये बुधवारी कोणत्या भागात पाणीपुरवठा नाही, घ्या जाणून…

नाशिकरोडमधील पाण्याची टाकी भरणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीसाठी बुधवारी सकाळी आणि संध्याकाळी दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे.

No water in Nashik| नाशिकमध्ये बुधवारी कोणत्या भागात पाणीपुरवठा नाही, घ्या जाणून...
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 4:15 PM

नाशिकः नाशिकध्ये बुधवारी, 22 डिसेंबर रोजी अनेक भागात पाणी येणार नाही. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथून नाशिकरोडमधील पाण्याची टाकी भरणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीसाठी बुधवारी नाशिकरोडच्या काही भागात सकाळी आणि संध्याकाळी दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना बुधवारी पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. येथे गुरुवारी पाणीपुरवठा होईल. मात्र, तोही कमी दाबाने असेल. त्यामुळे शुक्रवारपासून येथील पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.

प्रभाग क्रमांक 17

नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक सतरामधील तिरुपतीनगर, टाकळीरोड परिसर, कॅनोल रोड परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसा, दसकगाव, शिवाजीनगर, एसएससीबी कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

प्रभांग क्रमांक 18, 19

नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक 18 मधील भगवा चौक, शिवशक्तीनगर, पंचक गाव, सायखेडारोड, पवारवाडी, इंगळे चौक, अयोध्या कॉलनी, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर प्रभाग क्रमांक एकोणीसमधील गोरेवाडी भागात पाणी येणार नाही, असे कळवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी उद्या मंगळवारी पाणी व्यवस्थित भरून ठेवले, तर त्यांना अडचण येणार नाही.

प्रभाग क्रमांक 20, 21

नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक वीसच्या पुनारोड परिसर, डावखरवाडी, जयभवानी रोड परिसर, अश्विनी कॉलनी, जेतवनगर, बिटको कॉलेज तरणतलाव या भागात पाणीपुरवठा होणार नाही. नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक एकवीसमधील जयभवानी रोड परिसर, सहाणे मळा, लवटेनगर एक आणि दोन, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदिर रोड, धोंगडेनगर, जगतपा मळा, तरणतलाव परिसर, चव्हाण मळा, फर्नांडिस वाडी, भालेराव मळा, जाचकनगर, नंदनवन कॉलनी, आवटेनगर या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

प्रभाग क्रमांक 22  नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक बावीसमधील रोकडोबावाडी, डोबी मळा, सुंदरनगर या भागात पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा सुरू राहणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. या भागात गुरुवारी पाणीपुरवठा होईल. मात्र, हा पाणीपुरवठाही कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.

इतर बातम्याः

पोटात पाप म्हणूनच म्हणूनच मैं जेल में जाऊंगाचा आरडाओरडा, सोमय्यांचे मलिकांवर शरसंधान; चोरीचा माल वापस किया म्हणत राऊतांवर टीका

Nashik| अचाट खाणे न् मसणात जाणे…काय, तर टोमॅटोच्या कॅरेटमधून दारूची तस्करी, 15 लाखांचा साठा जप्त

Special Report| रामकथेचा पट उलगडला इथल्या मातीवरती; नववर्षात रम्य गाव कुसुमांचे बघाच, नाशिकला फिरायला याच…!

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.