Pune crime | पुण्यात टुरिस्ट गाडी चालवण्याच्या बहाण्याने चालवत होते वेश्या व्यवसाय ; दलालांना अटक

संशयीत आरेापी महतो आणि साव यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात त्यांनी टुरिस्ट गाडी चालवत असल्याचे भासवुन परराज्यातील महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यावसायास करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Pune crime | पुण्यात टुरिस्ट गाडी चालवण्याच्या बहाण्याने चालवत होते वेश्या व्यवसाय ; दलालांना अटक
pune-police
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 5:43 PM

पुणे – शहारातील वाढत्या वेश्या- व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत.  पर्यटक(Tourist)  असल्याचा नावाखाली वेश्या व्यवसायासाठी महिला पुरविणार्‍या परराज्यातील टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. येरवडा आणि विमाननगर (Yerawada and Vimannagar)परिसरात हा वेश्या व्यवसाय चालवला जात होता. कारवाई दरम्यान सुरक्षापथकाने दोन तरूणींची सुटका केली आहे. त दलालाला बेड्या ठोकण्यात आल्या. कुलदिप प्रसाद मोहनप्रसाद महतो (26, ठाणे मुळ रा. झारखंड) आणि जयशंकर प्रसाद रमेश साव (20, मुंबई, मुळ रा. झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या भागात टुरिस्ट गाडीचा उपयोग वेश्या व्यवसायासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

बनावट गिऱ्हाईक बनून केला पर्दाफाश

टुरिस्ट गाडीचा उपायोग वेश्यागमनासाठी केला जात आहे.शहरातील येरवडा आणि विमानतळ परिसरात हा वेश्या- व्यवसाय चालवला जातोय सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचार्‍यांना मिळाली. त्यानुसार विभागाचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांनी दोन्ही संशयीत आरोपींचा नंबर मिळवून त्यावर बनावट गिर्‍हाईकास बोलण्यास सांगितले. त्यांनी विमाननगर मधील साकारे नगर येथील ईस्ट फिल्ड या हॉटेलमध्ये दोन रूम बुक करण्यास सांगितले. त्याप्रमाणे बनावट ग्राहकाने दोन रूम बुक केल्या. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक माने उपनिरीक्षक श्रीधर खडके, हवालदार राजेंद्र कुमावत, राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, पोलिस नाईक अण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे यांनी सापळा रचून टुरिस्ट गाडीत आलेल्या दोन पिडीत महिलांची सुटका करत दोन संशयीत आरोपींना अटक केली.  संशयीत आरेापी महतो आणि साव यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात त्यांनी टुरिस्ट गाडी चालवत असल्याचे भासवुन परराज्यातील महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यावसायास करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त रविंद्र शिंसवे, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Russia Ukraine War: आहे त्या साधनांसह क्यीव सोडा, असं काय घडण्याची भीतीय भारत सरकारला? असा निर्वाणीचा इशारा द्यावा लागला

“उद्धवजी, तुम्ही शरद पवार यांच्या समोर झुकू नका”, आशिष शेलारांचा ठाकरेंना सल्ला

नवीनचा मृतदेह शक्य तितक्या लवकर भारतात आणू, परराष्ट्र मंत्रालयाकडून नवीनच्या कुटुंबीयांचं सांत्वन