Pune : पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण पाण्यात बुडाला, शोध मोहिम सुरु असताना…

| Updated on: Mar 12, 2023 | 8:49 AM

तरुणाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जवळच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Pune : पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण पाण्यात बुडाला, शोध मोहिम सुरु असताना...
pune maval jadhav
Image Credit source: tv9marathi
Follow us on

पुणे : पुणे (PUNE) जिल्ह्यातील मावळ (MAVAL) तालुक्यात जाधववाडी धरणात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी तरुण बुडाला असल्याची माहिती वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली. त्यावेळी तिथं बघ्यांची गर्दी झाली होती. तिथल्या लोकांनी ही तरुण बुडल्याची माहिती सुरुवातीला पोलिसांना दिली. पोलिस (MAVAL POLICE) घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पाहणी केली. त्यानंतर तरुणाचा शोध घेण्यासाठी तिथं मावळ वन्यजीव रक्षक टीमला पाचारण करण्यात आलं. हमूद अनारुद्दीन खान असं त्या तरुणाचं नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली आहे.

नेमकं काय झालं

मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून एका 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मावळ वन्यजीव रक्षक टीमच्या सदस्यांनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सदर युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. हमूद अनारुद्दीन खान,असं त्या युवकाचे नाव आहे. एनडीआरएफसह; वन्यजीव रक्षक टीमचे निलेश गराडे, गणेश निसाळ,भास्कर माळी, यांनी सदरचा मृतदेह बाहेर काढला.यावेळी नवलाख उंब्रे एमआयडीसी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

तरुणाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जवळच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तरुणाच्या घरच्यांना सुध्दा मोठा धक्का बसला असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून याची चौकशी करण्यात येणार आहे.