Maharashtra News LIVE : जळगावात भाजपच्याच नगरसेविकेने प्रभागातील समस्याबाबत महापौरांसमोर वाचला पाढा
Maharashtra News LIVE Updates: आज राज्यातील आठ महानगरपालिकांचे महापौर ठरणार आहेत. तर या महापालिकेत उपमहापौराची पण निवड होणार आहे. गटनेता निवडीनंतर आजचा मोठा दिवस आहे. तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रियेतून सुरू असलेले राजकारण अद्यापही थांबलेले नाही. दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.

आज राज्यातील 8 महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवड होणार आहे. काही महानगरपालिकेत गटनेता पदाची निवड झाली आहे. तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील वाद अजून संपलेला नाही. गटनेता पदाची नोंदणीच अजून रखडली आहे. मालेगावमध्ये एमआयएमच्या नेत्यांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्याने चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा अजूनही शमलेल्या नाहीत. दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. या वादात इतर पक्षांच्या नेत्यांनी पण उडी घेतल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करण्यात येत आहे. राज्यातील इतर प्रमुख घडामोडींची अपडेट इथं पाहा
LIVE NEWS & UPDATES
-
केडीएमसी महापौर निवासस्थानाची दुरवस्था पुन्हा एकदा उघड
केडीएमसी महापौर निवासस्थानाची दुरवस्था पुन्हा एकदा उघड
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंद बंगल्यावर पुन्हा करोडोंचा खर्च
KDMC च्या महापौर हर्षाली चौधरी यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह केली बंगल्याची प्रत्यक्ष पाहणी
दयनीय अवस्था पाहून तात्काळ दुरुस्तीचे आदेश
-
परंडा तालुक्यातील शेळगाव येथे भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
परंडा तालुक्यातील शेळगाव येथे भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
गाडी अडवून जीवघेणा हल्ला केल्याचा नातेवाईकांचा आरोप
पाठलाग करणारी गाडी पोलिसांनी केली जप्त, ऐन निवडणूक काळात गाडीत काठ्या आणि कुऱ्हाडी आढळल्यानं मोठी खळबळ
राजकीय वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप
चार जणांविरोधात अंबी पोलिसात गुन्हा दाखल
-
-
कांदिवली पोलीस आणि बीएमसीची बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध मोठी कारवाई
कांदिवली पोलीस आणि बीएमसीची बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध मोठी कारवाई
पोलिसांनी उघड्यावर दारू पिणाऱ्या लोकांना रंगेहाथ पकडले
कांदिवली पश्चिम ९० फूट रोड, गणेश नगर आणि ओल्ड लिंक रोडवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई
महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात समान जप्त
-
जळगावात भाजपच्याच नगरसेविकेने प्रभागातील समस्याबाबत महापौरांसमोर वाचला पाढा
जळगावात महापौरांनी पदभार घेताच भाजपच्याच नगरसेविकेने प्रभागातील समस्याबाबत महापौरांना पहिले निवेदन दिले आहे. प्रभाग 13 मधील गटारे, रस्ते यासह कचऱ्याच्या घंटागाड्या संदर्भात भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना निवेदन दिले आहे. गेल्या अडीच वर्षात प्रशासक असल्याने अनेक कामे रखडली असून समस्या असल्याने त्या मार्गी लावाव्यात अशी मागणी नगरसेविका वैशाली पाटील यांनी केली आहे. प्रभागातील अधिकारी मक्तेदार यांची बैठक घेऊन कामे मार्गी लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात अशी मागणी नगरसेविका वैशाली पाटील यांनी केली आहे
-
अजित पवार विमान अपघात: चौकशी अहवालातील निरीक्षणं उघड
उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासह चार जणांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. या प्रकरणाची राज्य सीआयडी आणि डीजीसीएकडून चौकशी सुरु आहे. यात आता चौकशी अहवालात काही निरीक्षणे नोंदली गेली आहेत. विमान उतरण्याच्या क्षणी त्यांच्या नियंत्रण प्रणालीमध्ये किंवा इंजिनामध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला असावा,परिणामी पायलटचे विमानावरचे नियंत्रण सुटले असावे. विमान लँडिंग करत असताना पायलटचा लँडिंगचा अँगलच चुकल्याने हा अपघात घडला असावा. प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक समस्यांमुळे पायलटला धावपट्टीची योग्य दिशा आणि उंची राखण्यात अडचण आली होती.धावपट्टीचा अंदाज घेण्यात झालेली ही चूक विमानाची गती आणि इंधन स्थिती लक्षात घेता जीवघेणी ठरली.आदी महत्वाची निरीक्षणे प्राथमिक अहवालात नोंदविण्यात आली असून, विमान अपघाताबाबतचा सविस्तर चौकशी अहवाल समोर आल्यानंतर याबाबत आणखी स्पष्टता होईल असे म्हटले जात आहे.
-
-
काँग्रेसच्या दोन्ही गटाचे 27 नगरसेवक पुन्हा एकत्रित गट नोंदणीसाठी दाखल
चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी काल काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज वडेट्टीवार गट आणि धानोरकर गट या काँग्रेसच्या दोन्ही गटाचे 27 नगरसेवक आता पुन्हा एकत्रित गट नोंदणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. दोन्ही गटांनी आधी वेगवेगळी नोंदणी केली होती. मात्र, हायकमांडने त्यात हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही गटातील वाद मिटला आहे. त्यानंतर आता दोन्ही गट एकत्रित नोंदणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचले आहेत. यावर विभागीय आयुक्तांचा काय निर्णय येतो हे महत्त्वाचे आहे.
-
दिल्लीतील निवासस्थानासमोरील फुटपाथवर आक्रमण – अरविंद सावंत
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांच्या निवासस्थानासमोरील दुरावस्थेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणतात की राजधानीतील प्रतिष्ठित वस्तीत जर फुटपाथवर असे उघड अतिक्रमण होत असेल, तर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा नेमकी करतेय काय? हे चित्र म्हणजे ‘स्वच्छता अभियानाचा’ उडवलेला फज्जा आहे. वारंवार विनंती करूनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. दिल्लीच्या उच्चभ्रू भागांची ही अवस्था असेल तर इतरत्र काय अपेक्षा ठेवायची? संबंधित विभागाने यावर तातडीने कठोर कारवाई करावी असेही सावंत यांनी म्हटले आहे.
-
मुंबई : पी डिमेलो रोडवर मोठा अपघात झाला
मुंबईच्या पी डिमेलो रोडवर आज दुपारी एक मोठा अपघात झाला. भरधाव बीएमडब्लू कार आणि वॅगन आर गाडीची आपसात टक्कर झाली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झालं असून सुदैवाने कोणी जखमी झालेले नाही. दोन्ही गाडी रस्त्यावरून बाजूला हटविण्यात आली असून सध्या वाहतूक सुरळीत सुरु आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
-
देशाला तिसऱ्या आर्थिक महासत्तेकडे नेणारा अर्थसंकल्प – डॉ. हिना गावित
देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा मार्ग मोकळा करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून नंदुरबार जिल्ह्यालाही मोठ्या निधीची तरतूद करण्यात आल्याचा दावा भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केला आहे.
-
पनवेल : निळकंठ गार्डन सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर लागली आग
पनवेलमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. पनवेलमधील निळकंठ गार्डन सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
-
वाशीम : विज्ञान भारती नागपूर कडून तीन दिवशीय ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
वाशीममध्ये विज्ञानाची गोडी लावणारा आणि मानवी शरीराच्या अद्भुत रचनेचे रहस्य उलगडणाऱ्या ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनीला आजपासून प्रारंभ झाला. विज्ञान भारती नागपूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशीम यांच्या संयुक्त विद्यमानाने 6 ते 8 फेब्रुवारीदरम्यान या भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनीत हृदय, मेंदू, फुफ्फुसे यांसह मानवी शरीरातील विविध अवयवांची रचना व कार्यपद्धती प्रत्यक्ष मॉडेल्सद्वारे समजावून सांगण्यात येणार आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, सीटी स्कॅन, एमआरआय, हृदयशस्त्रक्रिया तसेच हार्ट अटॅकसारख्या आजारांबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
-
नागपुरातील APMCमधील भाजी व्यापाऱ्यांच्या संपामुळे व्यापारावर परिणाम
गाळे वाटपातील घोटाळा आणि प्रशासनाविरुद्ध विविध मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी व्यापाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. संपाच्या पहिल्या दिवशी नागपूरच्या कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारातील संपामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार प्रभावित. घाऊक भाजी बाजारातील जय किसान व्यापारी वेल्फेअर असोसिएशन विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. भाजीपाल्यांची आवक बंद असल्याने किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला खरेदी करता आला नाही. कॉटन मार्केट उपबाजारात काही प्रमाणात भाजीपाल्यांची आवक झाल्याने किरकोळ विक्रेत्यांना काही प्रमाणात मालाची खरेदी करता आली. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे अडतीये आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.
-
चंद्रपुरात महापौरपदाच्या मुद्द्यावरुन मुनगंटीवार आणि जोरगेवार आमने-सामने
चंद्रपुरात महापौरपदाच्या मुद्द्यावरुन मुनगंटीवार आणि जोरगेवार आमने-सामने….चंद्रपुरात संगीता खांडेकर भाजपकडून महापौर पदाच्या अधिकृत उमेदवार असताना सारिका संदुरकरांनी अर्ज दाखल केला. संगीता खांडेकर मुनगंटीवार समर्थक तर सारिका संदुरकर जोरगेवार समर्थक
-
2025 पासून 377 विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड- मुरलीधर मोहोळ
जानेवारी 2025 पासून 377 विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड झाला….तांत्रिक बिघाड झालेली विमान ही देशातील विविध नियमित विमान कंपन्यांची…केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची लोकसभेत माहिती…
-
अमरावती महानगरपालिकेत महापौरपदी भाजपा महायुतीचे श्रीचंद तेजवानी यांची निवड
अमरावती महानगरपालिकेत महापौरपदी भाजपा महायुतीचे श्रीचंद तेजवानी यांची निवड झाली आहे. भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला एमआयएमच्या बडनेरामधील महिला नगरसेविका मीरा कांबळे यांनी पाठिंबा दिला. अमरावतीमध्ये भाजप, युवा स्वाभिमान, शिंदेंची शिवसेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये एकूण 87 नगरसेवक निवडून आले आहेत.
-
जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी ते त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाल्या आहेत.
-
अमरावती महापालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात
अमरावती महापालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणूक सुरू होण्यापूर्वीच भाजपचे नगरसेवक आशिष अतकरे यांची MIM च्या नगरसेवकांसोबत सभागृहात चर्चा सुरू आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीपूर्वी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार आशिष अतकरे यांच्याकडून MIM च्या नगरसेवकाची गळाभेट घेण्यात आली. आशिष अतकरे यांनी एमआयएमच्या नगरसेवकांची गळाभेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
-
नागपूरच्या उपमहापौरपदी भाजपच्या लीला हाथीबेड यांची निवड
नागपूर उपमहापौरपदासाठीच्या निवड प्रक्रियेचे अपडेट्स समोर आले आहेत. भाजपच्या उपमहापौरपदाच्या उमेदवार लीला हाथीबेड यांना 104 मतं मिळाली आहेत. काँग्रेसचे उपमहापौरपदाचे उमेदवार विवेक निकोसे यांना 36 मतं पडली आहेत. नागपूरच्या उपमहापौरपदी भाजपच्या लीला हाथीबेड यांची निवड झाली आहे. तर 11 नगरसेवक तटस्थ राहिले आहेत.
-
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे
जळगाव महापालिकेत महापौरपदासाठी भाजपच्या दीपमाला काळे यांची निवड झाली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. “महापालिकेत महापौर होत असल्याचा आनंद असताना दुसरीकडे जळगाव शहराची मोठी जबाबदारी असून या खुर्चीला कसा न्याय देता येईल असे प्रयत्न माझे राहणार आहेत. जे आपण कष्ट करतो त्याचे फळ कधी ना कधी मिळत असते, त्यानुसार पक्षाच्या वतीने आज महापौर होण्याचा मान मला मिळाला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
-
अजित पवार आज आपल्यात नाहीत हे खूप दु:खद – दत्तात्रय भरणे
अजित पवार आज आपल्यात नाहीत हे खुप दु:खद आहे. दादांचा अपघाती मृत्यू कोणीही घातपात म्हणू नये असं राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. त्यांनी सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली.
-
धुळे महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा
धुळे महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा. महापौर पदी मायादेवी परदेशी तर उपमहापौर पदी ज्योत्स्ना पाटील या विजयी. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन महापौर उपमहापौर यांना शुभेच्छा.
-
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अखेर भाजपचा महापौर
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अखेर भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर. अशी अधिकृत माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि शिवसेनेचे पक्ष निरीक्षक विलास पारकर यांनी दिली. भाजपा आणि शिवसेना महापौर, उप महापौर यांच्या नावाची घोषणा काही तासांच्या आत करतील.
-
नागपूरच्या महापौरपदी नीता ठाकरे
भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार नीता ठाकरे यांना 104 मत पडली. काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार स्नेहल ठाकरे यांना 36 मत पडली. नागपूरच्या महापौर पदी भाजपच्या नीता ठाकरे यांची निवड झाली. आता उपमहापौर पदा साठी निवड सुरू.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर, उप महापौर निवडीसाठी राजकीय घडामोडींना वेग
शिवसेना पक्ष निरीक्षक विलास पारकर हे भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या भेटीला. बैठकीत भाजपा गट नेते गोविंद केंद्रे पण उपस्थित. भाजपा आणि शिवसेना महापालिकेत एकत्र येणार का?. भाजपाकडून शिवसेनेला उपमहापौर पद दिले जाण्याची शक्यता. मनपा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढली होती. शिवसेनेच्या मनपा निवडणूक मध्ये 13 तर भाजपच्या 57 जागा निवडणून आल्या होत्या. बहुमतासाठी भाजपचे 57 नगरसेवक आहेत आणि त्यांना बहुमतासाठी एक जागा कमी पडते. शिवसेना ही भाजप सोबत आल्यास भाजपचा मार्ग सुकर होणार आहे.
-
नाशिक- भाजपाच्या हीमगौरी आडके झाल्या महापौर
नाशिक – भाजपाच्या हीमगौरी आडके महापौर यांची नियुक्ती झाली. तर शिंदे शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
-
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल बिनविरोध
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल बिनविरोध. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहत कामकाजाला सुरुवात केली . भाजपकडून महापौर पदासाठी विनायक कोंड्याल यांचं नाव. ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रियदर्शन साठे आणि एमआयएमच्या तौफिक हत्तूरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात माघार घेतली .
-
अजित पवार यांच्या खाजगी सचिवांकडे सीआयडीची चौकशी
अजित पवार यांच्या खाजगी सचिवांकडे सीआयडीने चौकशी केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाजगी सचिवांकडून माहिती जाणून घेतली.
२८ जानेवारी रोजी अजित पवारांच्या बारामती दौऱ्याबाबत माहिती घेण्यासाठी सी आय डी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. 27 जानेवारीच्या रात्री दौऱ्याबाबत काही चर्चा झाली होती का याबाबत देखील अधिकाऱ्यांनी चौकशी केली . अजित दादांच्या प्रवासाचे नियोजन कसे आणि कोणी केले होते याबाबत सुद्धा विचारपूस करण्यात आली.
-
धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीला सुरुवात..
धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. पिठासीन अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीमध्ये महापौर निवडणूक प्रक्रिया सुरू. महापौर पदासाठी तिरंगी लढत आहे. भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गट, एम आय एम पक्षांचे सदस्य सभागृहात दाखल झाले आहेत.
-
नाशिक महापालिकेचे महापौर-उपमहापौर ठरले, कोणाची वर्णी?
नाशिक महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले हे दोन्ही पक्ष आता सत्तेत सहभागी होणार आहे. सत्तेच्या या समीकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही भाजपला पाठिंबा दिला आहे. ठरलेल्या सूत्रानुसार, नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके यांची वर्णी लागणार आहे. तर उपमहापौरपद शिंदे गटाच्या वाट्याला गेले असून विलास शिंदे या पदाची धुरा सांभाळणार आहेत.
-
मुंबई महानगरपालिका स्थायी समितीसाठी ठाकरे गटाकडून 3 नावांची चर्चा
मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठी शिवसेना ठाकरे गटात वेगवान हालचाली पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्री वर झालेल्या विशेष बैठकीत तीन अनुभवी नगरसेवकांच्या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये माजी महापौर विशाखा राऊत, माजी स्थायी समिती अध्यक्ष मिलिंद वैद्य आणि मिनाक्षी अनिल पाटणकर यांच्या नावांचा प्रामुख्याने विचार सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका आणि पक्षाची पालिकेतील पकड मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने अभ्यासू आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले आहेत. या नावावर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
धुळे महापौर-उपमहापौर निवडणूक: महापालिकेवर कुणाचा झेंडा? भाजप आणि महायुतीतच तिरंगी लढत
धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ७४ पैकी ५० जागांसह स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपने महापौर पदासाठी मायादेवी परदेशी, तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनीही आपले उमेदवार उभे केल्याने येथे तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी महापालिका परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
धाराशिवमध्ये २ दिवसांपासून गूढ आवाज; नागरिकांमध्ये भीती
धाराशिव शहरासह कळंब, वाशी आणि भूम परिसरात गेल्या दोन दिवसांपासून गूढ आवाजांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या आवाजांची तीव्रता इतकी मोठी होती की, अनेक ठिकाणी घरातील भांडी, खिडक्या आणि दरवाजे हादरल्याचे नागरिकांनी सांगितले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेकांना लातूर-किलारी भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. मात्र, या संदर्भात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केले आहे की, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडे भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
-
गडचिरोलीत सी-६० पथक आणि माओवाद्यांमध्ये भीषण चकमक; एक जवान शहीद, ३ माओवाद्यांना कंठस्नान
गडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातील सॅन्ड्रा मांडरा परिसरात काल रात्री सी-६० पथक आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत तीन माओवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिला माओवाद्याचा समावेश असून, माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मात्र, या चकमकीत सी-६० पथकाचे जवान दीपक मडावी यांना वीरमरण प्राप्त झाले. तर जोगा मडावी हे जवान जखमी झाले आहेत. यावेळी घटनास्थळावरून ए.के. ४७ आणि एस.एल.आर. सह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
-
परीक्षेचा ताण सोडा, अभ्यासाचे नियोजन करा – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियममध्ये परीक्षा पे चर्चा २०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना यशाचा कानमंत्र दिला. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयाची तयारी कशी करायची याचे चोख नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा हे आधीच ठरवल्यास अभ्यासाचा ताण येत नाही. वेळेचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे असून आज केलेली मेहनतच तुमचे भविष्य उज्ज्वल करेल अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. आत्मविश्वासाने आणि योग्य नियोजनाने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
-
परीक्षा पे चर्चा २०२६ : पंतप्रधान मोदींनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२६ अंतर्गत नवी दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियममध्ये देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षेचा ताण, भीती आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. परीक्षा हा आयुष्याचा अंत नसून ती केवळ एक पायरी आहे, असा मंत्र मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला दिला.
-
अमरावती महानगरपालिकेच्या ठरला महापौर
महायुती कडून श्रीचंद तेजवानी; तर काँग्रेस कडून संजय शिरभाते महापौर पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात. उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमान कडून सचिन भेंडे तर काँग्रेस कडून लुधना तनवीर निवडणुकीच्या रिंगणात, पहिल्या सव्वा वर्षात भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या सव्वा वर्षासाठी भाजपचे आशिष अतकरे यांची नावे. रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टी सोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेमध्ये सहभागी. अमरावती महानगरपालिकेला आज लाभणार सतरावे महापौर आणि उपमहापौर. तब्बल चार वर्षानंतर आज अमरावती महानगरपालिकेमध्ये बसणार महापौर
-
मनपाच्या 227 कोटींच्या मलनिस्सारण प्रकल्पास मंजुरी
१२० कोटींच्या नवीन तर १०७ कोटींच्या जुन्या मलवाहिका बदलणार. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या अमृत २ अभियानांतर्गत मलनिस्सारण प्रकल्पांना राज्य शासनाची प्रशासकीय मंजुरी. प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीप्रदूषणमुक्तीच्या प्रयत्नांना मिळणार बळ
-
केडीएमसीमध्ये नेमकं चाललंय तरी काय?
महापौर–उपमहापौर पदावर विराजमान , पण गाडी-चालक-सुरक्षा नाही. महापौर–उपमहापौर निवड होऊन तीन दिवस उलटून मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनावर नाराजी इतर महापालिका तत्पर; KDMC प्रशासन मात्र मागेमहापौर–उपमहापौरयाच्या नाराजी नंतर आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर 19 कर्मचाऱ्यांची तात्पुरती व्यवस्था
-
काँग्रेस नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक
काँग्रेस नवनिर्वाचित नगरसेवकांचा सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करत महत्त्वाची बैठकय बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदर्भातील सर्व नियुक्त्यांचे अधिकार प्रदेशाध्यक्षांना देण्याचा ठराव. मुंबईच्या टिळक भवनात ठराव; मंजूर जिल्हा व प्रदेश अध्यक्ष सह इतर पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया अजित पवारच पुढे घेऊन जात होते
मात्र काही नेत्यांना आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल असं वाटत असल्याने डावपेच. खासदार निलेश लंके यांची नाव न घेता राष्ट्रवादी विलीनीकरण विरोध करणाऱ्या नेत्यांवर टीका. पुणे महानगरपालिकेत चॉईसने उमेदवारांना चिन्ह दिली. जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळ चिन्हावरील उमेदवारांचा जयंत पाटील मी प्रचार केला , वरिष्ठ पातळीवर सर्व काही ठरलं होतं
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदी कोण?
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी नामनिर्देशन भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज घेता येणार असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.दरम्यान, भाजपने गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी निवड केली असून, काल भाजपच्या सर्व नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन गट नोंदणी पूर्ण केली आहे. भाजपचा महापौर कोण होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. सध्या समीर राजूरकर, अनिल मकरिये, महेश माळवतकर आणि शिवाजी दांडगे ही चार नावे चर्चेत आहेत.
-
बनावट कागदपत्रांआधारे चारचाकी विक्रीचा प्रकार
जळगावात आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करून मूळ मालकाच्या संमतीशिवाय महागडी चारचाकी गाडी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराज पाटील, अक्षय सोनवणे व आणखी तीन जण अशा एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिंप्राळा परिसरातील सोनी नगर, आनंद मंगल सोसायटी निसर्ग कॉलनीसह या परिसरात दूषित पाणीपुरवठा येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे उलटी जुलाब पोटदुखी या आजारांची भीती बळावली आहे. जळगाव महानगरपालिकेने त्वरित याकडे लक्ष देऊन दूषित पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
-
लष्करी अधिकाऱ्याच्या धाडसामुळे चालकाचा जीव वाचला
वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पुलावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला होता. मात्र, प्रसंगावधान राखत नायर आशिष कुमार यादव यांनी तत्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला. सकाळी दहाच्या सुमारास पुलावरून जात असताना आशिष कुमार यादव यांना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली,चौकशी केल्यावर नाल्यात पडलेली चारचाकी पडल्याचे कळले. वाहनात हालचाल होत असल्याचे जाणवताच आत कोणी अडकले असावे, असा संशय आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नाल्यात उतरून पाहणी केली. कारमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत अडकलेली दिसली होती.
-
सगळ्यावर गुन्हे दाखल करतो म्हणत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतापले
वाढीव शिक्षक द्या या मागणीसाठी विद्यार्थी व पालक जिल्हा परिषद आवारात आले असता हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड विद्यार्थ्यांसह पालकावर संतापले. आमच्या शाळेला वाढीव शिक्षक द्या या मागणीसाठी सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील विद्यार्थी व पालक मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या दालनात आले असता मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड संतापल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
संभाजीनगरमध्ये अवैध शस्त्रांविरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रांविरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पाचोड परिसरात कारवाई करत गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह एका तरुणाला अटक केली. जालन्यातील देशगव्हान येथील विशाल लहु पालवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
-
सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी आज मतदानाची प्रक्रिया
सोलापूर महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचे अर्ज दाखल करण्यात आलेत. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि एमआयएम पक्षाने उमेदवार दिले आहेत. शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रियदर्शन साठे यांना उमेदवारी तर एमआयएमकडून महापौर पदासाठी तौफिक हत्तुरे तरी उपमहापौर पदासाठी आसिफ शेख यांना उमेदवारी देण्यात आलीय.
-
अमरावतीत ठरणार महापौर आणि उपमहापौर पदासाठी
अमरावती महानगरपालिकेच्या ठरला महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. महायुती कडून श्रीचंद तेजवानी तर काँग्रेस कडून संजय शिरभाते महापौर पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमान कडून सचिन भेंडे तर काँग्रेस कडून लुधना तनवीर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्या सव्वा वर्षात भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसर्या सव्वा वर्षासाठी भाजपचे आशिष अतकरे यांची निवड झाली. रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टी सोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेमध्ये सहभागी झाली आहे.
Published On - Feb 06,2026 8:11 AM
