Maharashtra Breaking News Live : पाऊस कमी पडत असल्यानं राज्याला जलसंधारणाची गरज; देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

| Updated on: Mar 13, 2023 | 8:47 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : पाऊस कमी पडत असल्यानं राज्याला जलसंधारणाची गरज; देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत त्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना उत्तरे देणार आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल ईडीची धाड पडली. त्यामुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. सदानंद कदम प्रकरणात ईडीने थेट कोर्टात आमदार अनिल परब यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Mar 2023 08:47 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर : संग्राम नगर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

    संग्रामनगर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे 3 लाख नागरिकांना फटका

    जुन्या शहराला सातारा देवळाई परिसराशी जोडणारा महत्वाचा पूल

    संग्रामनगर उड्डाणपूल गेल्या एक महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद

    रस्त्याच्या कामासाठी उड्डाणपूल बंद केल्यामुळे नागरिकांना फटका

  • 12 Mar 2023 08:29 PM (IST)

    या राज्यातील नागरिकांना नाही द्यावा लागत आयकर

    नागरिकांना इनकम टॅक्समध्ये सवलत

    येथील नागरिकांना छदाम ही नाही द्यावा लागत

    ही आहे अफवा, की खरंच कर झाला माफ

    काय आहे नेमकं कारण, कोणते आहे हे राज्य, वाचा बातमी 

  • 12 Mar 2023 06:36 PM (IST)

    SEBI कडून मिळवा 20 लाखांचे बक्षीस

    घरबसल्या कमाईची संधी आली चालून

    सेबीने केली मोठी घोषणा, करावे लागेल हे काम

    सेबी ही आर्थिक नियामक संस्था, अनके जण रडारवर, वाचा सविस्तर

  • 12 Mar 2023 05:38 PM (IST)

    युट्यूब झाले या तरुणाचे गुरु

    त्यानंतर हा तरुण झाला अनेकांचा गुरु

    युट्यूबवर दहा वर्षे पोस्ट केले व्हिडिओ

    उभी केली 25,000 कोटींची कंपनी

    आज अनेक कंपन्यांमध्ये करत आहे गुंतवणूक

    पगाराचा आकडा तर तुमचे डोळेच दिपवेल, वाचा सविस्तर 

  • 12 Mar 2023 04:49 PM (IST)

    500-1000 रुपयांच्या जुन्या नोटांविषयी काय झाला फैसला

    या नोटा पुन्हा बदलता येणार काय?

    सोशल मीडियावर होतोय मॅसेज व्हायरल, त्याची सत्यता काय

    पत्र सूचना कार्यालयाने काय केला पडताळा

    RBI ने आणि केंद्र सरकारने काय घेतला निर्णय, वाचा बातमी 

  • 12 Mar 2023 03:47 PM (IST)

    उल्हासनगर : मनसे पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

    यापूर्वी मनसेच्याच पदाधिकाऱ्याने केली होती मारहाण

    मनसेतील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याची चर्चा

    इंस्टाग्रामवर देण्यात आली जीवे मारण्याची धमकी

  • 12 Mar 2023 03:45 PM (IST)

    कल्याण : ट्रान्सफॉर्मरमधील वायरच्या विजेच्या झटक्याने 12 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

    कल्याण चक्की नाका परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या टेरेसवर घडली घटना

    टेरेसवर खेळत असताना ट्रानसफॉर्मरच्या वायरला हात लागल्याने घडली घटना

    ट्रानसफॉर्मर लागूनच पालिकेने उभारलेय शौचालय

  • 12 Mar 2023 03:37 PM (IST)

    Virat Kohli Century : सेंच्युरी ठोकण्याधी विराटने 'या' मंदिरात घेतलेलं दर्शन, 2 महिन्यात विराटने काय नाय केलं?

    India vs Australia: विराट कोहलीने कुठल्या मंदिरात माथा टेकवला? वाचा सविस्तर.....

  • 12 Mar 2023 02:38 PM (IST)

    Virat Kohli : डोळ्यासमोर 100 शतकं, विराट सचिन सारखं वयाच्या 40 पर्यंत खेळू शकतो का?

    Virat Kohli : तुम्हाला काय वाटतं? विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणं जमेल का? विराटकडे अजून किती वर्षांच क्रिकेट शिल्लक आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.

  • 12 Mar 2023 02:10 PM (IST)

    नाशिक : पारंपरिक रहाडीसोबत शहरातील पाण्याचे शॉवर सुरू

    नाशिक : पारंपरिक रहाडीसोबत शहरातील पाण्याचे शॉवर सुरू

    रोकडोबा तालीम संघाचा शॉवर डान्स सुरू

    हजारो तरुण तरुणींचा शॉवर डान्समध्ये डान्स

    डीजेच्या तालावर धरला ताल

  • 12 Mar 2023 01:42 PM (IST)

    रंग पंचमीच्या दिवशी भांगेमुळे पती-पत्नीचा बाथरुममध्ये मृत्यू? घाटकोपरमधील धक्कादायक घटना

    रंग पंचमी खेळून आल्यानंतर दोघे एकत्र आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले होते. वाचा सविस्तर.....

  • 12 Mar 2023 01:42 PM (IST)

    Virat Kohli | विराट कोहली याचं अहमदाबाद कसोटीत झुंजार शतक

    विराटने जवळपास कसोटी क्रिकेटमध्ये 3 वर्षांनी हे शतक ठोकलंय. वाचा सविस्तर....

  • 12 Mar 2023 01:40 PM (IST)

    IND vs AUS Test : Virat Kohli म्हणून संतापाच्या भरात केएस भरतवर ओरडला, VIDEO व्हायरल

    IND vs AUS Test : तो गोंधळ टीम इंडियाला महाग पडला असता. वाचा सविस्तर.....

  • 12 Mar 2023 01:37 PM (IST)

    येत्या दोन महिन्यात राणेंच मंत्रिपद जाणार - आमदार वैभव नाईक

    वैभव नाईक यांची राणेंवर टीका

    नारायण राणे यांचं राजकीय अस्तित्व आता भाजप ठरवणार आहे.

    भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार.

    'नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना इडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला?'

    'ईडीच्या नोटीसच काय झालं. वडिलांनी नेमका कोणता समझोता केला ? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा.'

  • 12 Mar 2023 01:36 PM (IST)

    सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर गंभीर आरोप

    सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर गंभीर आरोप

    सदानंद कदमांवर कारवाई करण्यासाठी रामदास कदमांनीच सांगितलं असाव

    खेडच्या सभेनंतर रामदास कदम अस्वस्थ झाले होते

    योगेशच्या वडिलांनी 50 खोक्यासाठी पक्षासाठी गद्दारी केली

    सदानंद कदमांना रामदास कदमांना आयुष्यातून उठवलं

    1 लाख 1 टक्के रामदास कदमांचा हात आहे

    योगेश कदमांचा मतदारसंघ जाईल म्हणून ते तिकडे जाऊन बसले असतील की काहीतरी करा

    त्यामुळे या कारवाईत रामदास कदमांचाच हात आहे

    खेडच्या सभेनंतर महाराष्ट्र भाजपाची आणि गद्दार गटाची गाळण उडाली आहे

    आम्हाला गर्दी जमवायची गरज नाही

    आम्ही जिथं उभं राहतो तिथं गर्दी होते काल आशिर्वाद यात्रेत 500 चं लोक होती

    सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर गंभीर आरोप

    रामदास कदमांना झोप येणार नाही कारण त्यांच मन त्यांना खात राहिलं

  • 12 Mar 2023 01:35 PM (IST)

    कुणी झाशीची राणी तर कुणी झालं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, एकल महिलांचा रॅम्पवॉक

    एकल, विधवा महिलांसाठी अनोखी फॅशन शो स्पर्ध

    नगरच्या कोपरगावात सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान आणि स्टारडम इंडिया या सामाजिक संस्थेने एकल महिलांसाठी फॅशन शोचे आयोजन केले होते

    समाजातील कर्तबगार महिलांची वेशभुषा साकारत महिलांनी केलेले रॅम्पवॉक ठरले आकर्षण

    या स्पर्धेत अकोले येथील सुरेखा पुंजा मंडलिक या प्रथम विजेत्या ठरल्या

    कोपरगाव येथील रश्मी शिवनारायण शर्मा यांनी द्वितीय आणि बारामती येथील अश्विनी तावरे तृतीय क्रमांक पटकावला

  • 12 Mar 2023 01:31 PM (IST)

    जळगावच्या मुक्ताईनगरात तब्बल एक कोटी किंमतीचा गुटखा पकडला

    राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

    मध्य प्रदेशातून ट्रकद्वारे होत होती गुटख्याची वाहतूक

    ट्रकमध्ये तब्बल एक कोटी रुपयांच्यावर गुटखा असल्याची प्राथमिक माहिती

    गुटख्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होताच तात्काळ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः कारवाई संदर्भात केली पाहणी

    मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात खानदेशात मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याचा प्रश्न एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत उपस्थित केला होता

  • 12 Mar 2023 01:29 PM (IST)

    मुक्ताईनगर येथे तब्बल एक कोटींचा गुटखा जप्त

    राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई 

    मध्य प्रदेशातून आलेला गुटखा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
    तब्बल एक कोटी रुपयांच्यावर या गुटख्याची किंमत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
    एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाईबाबत माहिती घेतली.
    मध्य प्रदेशातून खान्देशात मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याने विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
  • 12 Mar 2023 01:01 PM (IST)

    पाणी फाऊंडेशन फार्मर कप स्पर्धा 2022 पुरस्कार वितरण सोहळा

    पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कप स्पर्धा 2022 चा पुरस्कार वितरण सोहळा

    देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमीर खान यांची प्रमुख उपस्थिती,

  • 12 Mar 2023 12:43 PM (IST)

    नाशिकच्या दिंडोरीमधून लाँगमार्च निघणार 

    चार वर्षांनंतर पुन्हा एकदा धडकणार लाल वादळ

    शेकडो शेतकरी, कष्टकरी लोकांचा निघणार लाँगमार्च

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटना येणार एकत्र

    दिंडोरी येथून सुरुवात होऊन नाशिकला जाणार मोर्चा

    नाशिक येथे एकत्र जमून उद्या मुंबईकडे निघणार लाँगमार्च

    शेतीमालाला योग्य तो भाव मिळावा, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी

    वन जमिनींचा हक्क मिळावा यासह अनेक मागण्यांसाठी लाँगमार्च

  • 12 Mar 2023 11:45 AM (IST)

    सांगलीत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

    जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सांगलीत मोर्चा सुरू

    राज्यातील अनेक जिल्ह्यातून शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोर्चात सहभागी

    सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून निघाला मोर्चा

    कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते स्टेशन चौकापर्यंत निघणार मोर्चा

  • 12 Mar 2023 11:16 AM (IST)

    IND vs AUS Test : अहमदाबाद टेस्ट मॅच सुरु असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी

    IND vs AUS Test : टीम इंडियाच्या एका प्लेयर संदर्भातील बातमीने टेन्शन वाढलं. वाचा सविस्तर.....

  • 12 Mar 2023 11:14 AM (IST)

    सांगलीत आज शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

    जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सांगलीत आज मोर्चाचं आयोजन

    राज्यातील अनेक जिल्ह्यातून शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोर्चात होणार सहभागी

    सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून थोड्याच वेळात निघणार मोर्चा

    कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते स्टेशन चौकापर्यंत निघणार मोर्चा

  • 12 Mar 2023 11:11 AM (IST)

    एलआयसीत मोठी घडामोड, तुम्हाला माहिती आहे की नाही

    अदानी गुंतवणुकीचा साईड इफेक्ट

    केंद्र सरकारवर विरोधकांचा सातत्याने हल्लाबोल

    केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

    हिंडनबर्ग वादळात अदानी समूहाचे नुकसान

    आता एलआयसीतही वादळाचे साईट इफेक्ट

    एलआयसीत पहिला बळी कोणाचा?

    केंद्र सरकार गुंतवणुकीची चौकशी करुन कारवाई करणार? वाचा बातमी 

  • 12 Mar 2023 11:10 AM (IST)

    माधुरी दीक्षितला मातृशोक; आई स्नेहलता दीक्षित यांचं निधन

    अभिनेत्री माधुरी दीक्षितवर कोसळला दु:खाचा डोंगर

    आई स्नेहलता दीक्षित यांचं आज (रविवार) सकाळी साडेआठच्या सुमारास निधन, वाचा सविस्तर..

  • 12 Mar 2023 11:02 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

    पुण्यातील पु ल.देशपांडे सभागृहात राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

    राज ठाकरे घेणार पक्षाचा आढावा

    पक्षासोबत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत

    कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीनंतरची मनसेची महत्त्वाची बैठक

  • 12 Mar 2023 10:27 AM (IST)

    सोने घेतंय ग्राहकांची फिरकी

    भावाने घेतली बरं का गिरकी

    गेल्या दोन दिवसांपासून भावा तापले

    सोने-चांदी खरेदीची करा लगबग

    लग्नसराईत गेल्या महिन्याभरापासून मिळाला होता दिलासा

    आता भावात सातत्याने होत आहे वाढ

    ऑलटाईम हायपेक्षा अजूनही दर कमीच, वाचा बातमी 

  • 12 Mar 2023 10:25 AM (IST)

    नुसता फोर, सिक्सचा पाऊस, पाकिस्तानात T20 च्या एका मॅचमध्ये 515 धावा, आफ्रिदीने घेतली हॅट्ट्रिक, VIDEO

    Pakistan Super League च्या एका मॅचमध्ये 515 धावांचा पाऊस पडला. आफ्रिदीने PSL-8 मध्ये पहिली हॅट्ट्रिक घेतली. वाचा सविस्तर.....

  • 12 Mar 2023 10:24 AM (IST)

    IPL 2023 : किंमत फक्त 20 लाख, पण CSK साठी करेल मोठा धमाका, 8 व्या नंबरवर ठोकल्या 241 धावा

    IPL 2023 : बॅटच नाही, बॉलने पण कमाल करु शकतो. त्याने याआधी 7 चेंडूत 7 विकेट घेतल्यात. वाचा सविस्तर.....

  • 12 Mar 2023 10:23 AM (IST)

    GG vs DC : 10 फोर, 5 SIX, Shafali Verma ची धुवाधार बॅटिंग, फक्त 34 मिनिटात संपवली मॅच

    GG vs DC : एकहाती सामना कसा फिरवला जातो, ते शेफाली वर्माने दाखवून दिलं. शेफालीच्या वादळी खेळी समोर समोरची टीम पस्त झाली. तिने धुवाधार बॅटिंग केली. 106 धावांच टार्गेट फक्त इतक्या चेंडूत चेस केलं. वाचा सविस्तर....

  • 12 Mar 2023 10:22 AM (IST)

    विकेटच सेलिब्रेशन महाग पडलं, स्ट्रेचरवरुन न्यावं गेला, त्याचं वर्ल्ड कपमध्ये खेळणं कठीण

    ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्याचं खेळणं कठीण दिसतय. वाचा सविस्तर.....

  • 12 Mar 2023 09:37 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात उद्यापासून पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

    आठवड्यात झालेल्या पावसाने नुकसान तर रब्बी पिकांवर पुन्हा संकट कायम

    13 मार्च नंतर गारपिटीचा पाऊस होण्याची शक्यता

    उत्तर भारतात हिमालय पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण

    जिथे पोषक वातावरण तिथेच अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची हवामान खात्याचा इशारा

  • 12 Mar 2023 08:41 AM (IST)

    भारतीय तेल कंपन्यांचा मोठा खर्च वाचला

    रशियाकडून स्वस्तात इंधनाची खरेदी

    प्रत्येक बॅरलमागे दोन डॉलरचा मोठा फायदा

    कंपन्यांची नुकसान भरपाईची ओरड होणार का कमी

    वाहनधारकांना मिळणार का स्वस्तात इंधन

    केंद्र सरकार कधी करणार कर कपातीची घोषणा,  वाचा बातमी 

  • 12 Mar 2023 08:20 AM (IST)

    मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून एका 21 वर्षीय युवकाचा मृत्यू

    -मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून एका 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली

    -मावळ वन्यजीव रक्षक टीमच्या सदस्यांनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सदर युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला

    -हमूद अनारुद्दीन खान,असं या युवकाचे नाव

    -एनडीआरएफसह; वन्यजीव रक्षक टीमचे निलेश गराडे, गणेश निसाळ,भास्कर माळी, यांनी सदरचा मृतदेह बाहेर काढला.यावेळी नवलाख उंब्रे एमआयडीसी पोलीस कर्मचारी उपस्थित होते

  • 12 Mar 2023 08:17 AM (IST)

    नाशिक : नाशिकमध्ये आज रंगणार रंगोत्सव

    शहरात आज साजरी होणार रंगपंचमी

    रंगपंचमीच्या नाशिकची वेगळी परंपरा

    शहरात पेशवेकालीन रहाडी झाल्या सज्ज

    रहाडीमध्ये उड्या मारण्यासाठी नाशिककर उत्सुक

  • 12 Mar 2023 08:04 AM (IST)

    कोल्हापूर : आठ लाखांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक

    कोल्हापूर आणि सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संयुक्त कारवाई

    क्रिप्टो करेन्सी फसवणुकीतील गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वीकारली आठ लाखांची लाच

    जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नागेश मात्रे आणि कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांवर कारवाई

    मध्यरात्री एनसीसी भवन परिसरात लाच स्वीकारताना दोघांनाही रंगेहात पकडलं

    लाच लुचपतच्या कारवाई नंतर दोन्ही लाचखोरांचं पोलीस दलातून निलंबन

  • 12 Mar 2023 08:00 AM (IST)

    पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुन्हा पुणे दौऱ्यावर

    पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

    बालेवाडीत पार पडणार पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम

    कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमीर खान यांची प्रमुख उपस्थिती

  • 12 Mar 2023 07:43 AM (IST)

    आजपासून राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता

    आजपासून म्हणजे 13 ते 15 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

    मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

    त्यामुळं शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत कृषी विभागाचे आवाहन

  • 12 Mar 2023 07:25 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७७ कोटींच्या तूटीचा अर्थसंकल्प सादर

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा या वर्षाचा सुमारे ७७ कोटींच्या तूटीचा अर्थसंकल्प सादर

    गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत उत्पन्नात ४३ कोटींनी वाढ

    खर्च वाढल्याने जवळपास सात कोटींनी तूटही वाढली

    कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय अधिसभा पार पडली

    या अधिसभेत प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी अर्थसंकल्प केला सादर

  • 12 Mar 2023 06:32 AM (IST)

    सोमवारपासून लोकसभा अधिवेशनाचा दुसरा टप्पा होणार सुरू

    सोमवारी संसद भवनात सकाळी विरोधी पक्षनेत्यांची बैठक

    बैठकीत होत असलेल्या ईडी कारवाया, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न यावर होणार चर्चा

    सोमवारी होणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला हजर राहण्याच्या सूचना

    मल्लिकार्जुन खर्गेंच्या कार्यालयात बैठक होण्याची शक्यता

    ठाकरे गटाकडून प्रियंका चतुर्वेदी लावणार हजेरी

    राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत ईडीच्या कारवाई विरोधात आक्रमक होणार?

  • 12 Mar 2023 06:26 AM (IST)

    महाड शहरातील प्रभात कॉलनी येथे इमारत खचली, नागरिक घाबरले

    धरीया कॉम्प्लेक्समधील शिवम इमारत धोकादायक स्थितीत

    इमारतीचे चार कॉलमच्या फुटींग खालचा मातीचा भराव खचला

    इमारतीत राहत असलेल्या 18 कुटूंबांना नगर पालिकेने सुरक्षित ठिकाणी हलवले

    महाड नगर पालिका प्रशासन, अग्निशमन दल, पोलिस, RCC कंसलटंट घटना स्थळी दाखल

    रहिवाशांमध्ये घबराट

  • 12 Mar 2023 06:20 AM (IST)

    पुण्यातील भोरसह ग्रामीण भागात, ज्वारी काढणीच्या कामांना वेग

    उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात पेरलेल्या ज्वारी काढणीला सुरुवात

    ज्वारी काढून त्याची मळणी करून त्याची विक्री करण्याच्या मार्गावर शेतकरी

    सततच्या वातावरणाच्या बदलामुळे ज्वारी पिकाचे उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना भीती

  • 12 Mar 2023 06:18 AM (IST)

    सुषमा अंधारे यांची आज पु्ण्यात पत्रकार परिषद, सोमय्यांवर निशाणा?

    ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची आज पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे

    या पत्रकार परिषदेतून त्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधणार आहेत

    किरीट सोमय्या यांनी सदानंद कदम प्रकरणावरून अनेक आरोप केले होते, अनिल परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावाही केला होता

    सोमय्या यांच्या या आरोपांचा आज सुषमा अंधारे समाचार घेणार आहेत

Published On - Mar 12,2023 6:15 AM

Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.