SEBI Rewards : 20 लाखांच्या कमाईची संधी, सेबी देणार बक्षीस! करावे लागेल एवढे काम

SEBI Rewards : तुम्हाला ही घरबसल्या 20 लाखांच्या कमाईची संधी चालून आली आहे. पण त्यासाठी एक काम करावे लागेल. तुम्ही हे काम चोख बजावले तर शेअर बाजार नियामक संस्था सेबी तुम्हाला घोषीत केलेली रक्कम देईल.

SEBI Rewards : 20 लाखांच्या कमाईची संधी, सेबी देणार बक्षीस! करावे लागेल एवढे काम
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 6:31 PM

नवी दिल्ली : तुम्हाला ही घरबसल्या 20 लाखांच्या कमाईची संधी चालून आली आहे. पण त्यासाठी एक काम करावे लागेल. तुम्ही हे काम चोख बजावले तर शेअर बाजार (Share Market) नियामक संस्था सेबी (SEBI) तुम्हाला घोषीत केलेली रक्कम देईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असं काय काम करावं लागेल? तर काम म्हटलं तर सोप्पं आहे आणि म्हटलं तरं कठिणही. पण मनावर घेतल्यास तुम्हाला हे काम करता येईल. त्यासाठी तुमच्याकडे पक्की माहिती असणे आवश्यक आहे. त्यासंबंधीची पक्की कागदपत्रे, पक्का पुरावा असेल तर मग 20 लाख रुपयांवर तुम्हाला हक्क सांगता येईल.

डिफॉल्टर्सच्या संपत्तीची माहिती (Defaulter’s Property) तुम्हाला सेबीला सांगावी लागेल. डिफॉल्टरवर सध्या सेबीच्या रडारवर आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासाठी आणि पुढील कारवाईसाठी सेबीने हि शक्कल लढवली आहे. अर्थात या डिफॉल्टरची माहिती तुमच्याकडे हवी. त्यांच्या मालमत्तेविषयीची माहितीही तुम्हाला द्यावू लागणार आहे. सेबीने याविषयीची अधिसूचना काढली आहे. 20 लाख रुपयांचे बक्षीस दोन टप्प्यात देण्यात येईल. संपत्तीचे मूल्य 2.5 टक्के अथवा पाच लाख रुपये नगदी यापैकी जे कमी असेल त्याआधारे बक्षिसाची रक्कम देण्यात येईल.

भारतात मुद्यामहून बँकांची कर्ज बुडवणाऱ्यांची संख्या कमी नाही. या कर्ज बुडव्यांना धडा शिकवण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. भारतात 50 विलफुल डिफॉल्टर्सकडे बँकांचे 92,570 कोटी रुपये थकीत आहेत. नुकतीच केंद्र सरकारने याविषयीची माहिती संसदेत दिली. या कर्ज बुडव्यांकडून वसूलीचे सर्व प्रयत्न थकले आहेत. सेबीने 9 मोस्ट वॉन्टेड डिफॉल्टर्सची यादी तयार केली आहे. अर्थात ते सध्या गायब आहेत. पण जे हाती लागतील आणि त्यांची संपत्तीची माहिती मिळेल, ती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

सेबी बक्षीस दोन टप्प्यात देणार आहे. त्या संपत्तीच्या मूल्यांकनानुसार बक्षीसाची रक्कम मिळेल. 20 लाख रुपयांचे बक्षीस दोन टप्प्यात देण्यात येईल. संपत्तीचे मूल्य 2.5 टक्के अथवा पाच लाख रुपये नगदी यापैकी जे कमी असेल त्याआधारे बक्षीसाची रक्कम देण्यात येईल. डिफॉल्टरची माहिती, त्याची संपत्ती देणाऱ्याचे नाव, त्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार आहे. हे बक्षीस तेव्हाच मिळेल, ज्यावेळी तुम्ही दिलेली माहिती योग्य असेल. तसेच ही संपत्ती कर्ज बुडवणाऱ्यासंबंधीची असायला हवी, या अटी आहेत.

वसुलीनुसार, कर्जबुडव्यांची श्रेणी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात येते. त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. सेबीने देशातील 515 कर्जबुडव्याची यादी तयार केली आहे. जर या पैकी काही कर्जबुडव्यांची तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्हाला बक्षीसाची रक्कम मिळविता येईल. याविषयी एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती माहिती देणाऱ्यांची माहिती गोपनीय ठेवेल. तसेच त्याला किती बक्षीस द्यायचे हे ठरवेल. सेबी भारताचे वित्तीय नियामक संस्था आहे. 12 एप्रिल 1988 रोजी तिची स्थापना करण्यात आली. सेबी अधिनियम, 1992 अंतर्गत तिला मान्यता देण्यात आली. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तिचे मुख्य कार्यालय आहे. तर नवी दिल्ली, कोलकत्ता, चेन्न आणि अहमदाबाद येथे क्षेत्रीय कार्यालये आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.