Currency Notes : 500-1000 रुपयांच्या जुन्या नोटांचे आता काय होणार? RBI ने दिले हे उत्तर

Currency Notes : आरबीआयने 500 आणि 1000 रुपयांच्या जुना नोटासंबंधी मोठी अपडेट दिली आहे. जर तुमच्याकडे अजून ही या नोटा असतील तर जाणून घ्या, केंद्र सरकार आणि आरबीआयने काय म्हटले आहे ते..

Currency Notes : 500-1000 रुपयांच्या जुन्या नोटांचे आता काय होणार? RBI ने दिले हे उत्तर
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 4:44 PM

नवी दिल्ली : 2016 मध्ये देशात नोटबंदी (Indian Demonetized Currency) लागू झाली. नोव्हेंबर महिन्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नोटा बदलण्यासाठी जनतेला वेळ देण्यात आला. नोटा बंदी नंतर लांबच लांब रांगा लावून जनतेने त्यांच्याकडील नोटा बदलल्या. त्यानंतरही अनेकदा 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांविषयी बातम्या येऊन धडकल्या. आरबीआयने (RBI) 500 आणि 1000 रुपयांच्या जुना नोटासंबंधी (500 and 1000 Rupees Notes)मोठी अपडेट दिली आहे. या नोटा बदलण्याची आणखी एक संधी असल्याचे चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. केंद्र सरकारने (Central Government) त्यासाठी कालावधी वाढवल्याचा मॅसेज व्हायरल होत आहे. जर तुमच्याकडे अजून ही या नोटा असतील तर जाणून घ्या, केंद्र सरकार आणि आरबीआयने काय म्हटले आहे ते..

काही दिवसांपासून सोशल मीडियावर जुन्या नोटासंबंधीच्या पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये परदेशी नागरिकांसाठी केंद्र सरकारने विशेष सुविधा दिल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानुसार, परदेशी नागरिकांना 500-1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कालावधी वाढून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या मॅसेजमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. काहींनी या वाहत्या गंगेत हात धुता येतील का? याची चाचपणी सुरु केली आहे.

याप्रकरणाची पत्र सूचना कार्यालयाने (PIB Fact Check) गंभीर दखल घेतली. त्यांनी या संबंधीचा सर्व पडताळा केला. यासंबंधीची माहिती समोर आणली. पीआयबीने या व्हायरल पोस्टसंबंधीची माहिती जमा केली. त्याची तपासणी केली. त्यानंतर ही पोस्ट पूर्णपणे चुकीची असल्याचे आणि ही अफवा असल्याचे समोर आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात नोटबंदीची घोषणा केली होती. रात्री 8 वाजता पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात नोटबंदीची गरज आणि त्याचा परिणाम याचा तर्क दिला होता. तसेच रात्रीतूनच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा देशातून बाद करण्यात आल्या होत्या. तसेच नागरिकांना बँकांमधून या नोटा बदलण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर पुढील दोन महिने नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

असा करा व्हायरल मॅसेजचा पडताळा

  1. खोटे दावे करणारा व्हिडिओ, फेक मॅसेज असेल तर चिंता करु नका
  2. अशा मॅसेजचा पडताळा घ्या. लगेचच हा संदेश समोर पाठवू नका
  3. याविषयीचे वृत्त तुमच्याकडे आले असेल, तर ते फॉरवर्ड करण्याऐवजी ते तपासा
  4. मॅसेज, व्हिडिओ तुम्ही पीआयबीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाठवू शकता
  5. https://factcheck.pib.gov.in या संकेतस्थळावर असे मॅसेज पाठवता येतील
  6. पीआयबीच्या व्हॉट्सअप क्रमांक 918799711259 वर शहानिशासाठी मॅसेज पाठवता येतील
  7. pibfactcheck@gmail.com या ईमेलवर पण असे संदेश पाठवू शकता

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.