AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026 Prize Money : WPL जिंकताच RCB मालामाल, मिळालं कोट्यवधींच बक्षीस ! रक्कम ऐकून डोळेच विस्फारतील..

वुमन्स प्रीमिअर लीग 2026 चं विजेतेपद पटाकवून RCB (रॉयल चैलेंजर्स बंगळुरू)ने इतिहास रचला. दिल्लीच्या संघाला हरवून आरसीबीने दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. विजयाच आनंद तर आहेच पण आरसीबीच्या संघावर कोट्यवधींची उधळणही झाली.

WPL 2026 Prize Money : WPL जिंकताच RCB मालामाल, मिळालं कोट्यवधींच बक्षीस ! रक्कम ऐकून डोळेच विस्फारतील..
WPL 2026 जिंकताच RCB ला कोट्यवधींच बक्षीसImage Credit source: PTI
| Updated on: Feb 06, 2026 | 8:32 AM
Share

WPL 2026 Prize Money : वुमन्स प्रीमिअर लीग 2026 (WPL) स्पर्धेचा रोमांचक , थरारक असा फयानल सामना बडोद्याच्या कोटांबी स्टेडियममध्ये पार पडला. आणि त्यामध्ये RCB (रॉयल चैलेंजर्स बंगळुरू)ने दिल्ली कॅपिटल्स (DC) ला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. कॅप्टन स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकत अनोखा इतिहास रचला. 2024 साली आरसीबीने ही स्पर्धा जिंकली होती आणि काल पुन्हा तेच फायनलमध्ये अजिक्य ठरले आणि WPL च्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरलं गेलं. या विजयासह आरसीबीच्या टीमचा, सर्वाधिक विजेतेपद जिंकणाऱ्या संघांच्या यादीत मुंबई इंडियन्ससह समावेश झाला. .

RCB च्या टीमवर पैशांची बरसात

वुमन्स प्रीमिअर लीग 2026 (WPL 2026) च्या या नेहमी लक्षात राहणाऱ्या विजयानंतर आरसीबीच्या टीमला प्राईज मनी म्हणून कोट्यवध रुपये देण्यात आले. आरसीबीला 6 कोटी रुपयांचं मोठं बक्षीस मिळालं, तर उपविजेती दिल्ली कॅपिटल्सलाही टीमही रिकाम्या हाती परतली नाही. हे प्राईज मनी स्ट्र्क्चर WPL च्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहे. आतापर्यंत, मुंबई इंडियन्सने दोनदा विजेतेपद जिंकले असून त्यांनीही 6 कोटींचे बक्षीस मिळवले आहे, तर RCB ने 2024 च्या हंगामातही बक्षीसाची हीच रक्कम जिंकली होती. यावेळी, RCB ची सातत्यपूर्ण तयारी आणि मजबूत टीमवर्कमुळे त्यांना पुन्हा एकदा विजेतेपद मिळाले.

याशिवाय, स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू (ऑरेंज कॅप), सर्वाधिक विकेट घेणारी (पर्पल कॅप) आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू यांनाही प्रत्येकी 5 लाख रुपये मिळाले. एवढंच नव्हे तर सर्वाधिक षटकार मारणारी खेळाडू आणि सर्वोत्तम स्ट्राईक रेट असलेल्या खेळाडूला देखील प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

RCB कडून विक्रमी धावांचा पाठलाग

WPL 2026 च्या फायनलमधील कालचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठीस खूप खास होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 203 धावा केल्या आणि आरसीबीसमोर विजयासठी 204 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र् केवळ अंतिम सामन्यातच नाही तर महिला प्रीमियर लीगमध्येही इतक्या मोठ्या लक्ष्याचा कधीही पाठलाग केला गेला नव्हता. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्पर्धेचे विजेतेपद पटकावसाठी विक्रमी धावांचा पाठलाग केला आणि 19.4 षटकांत केवळ 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. आणि ट्रॉफीवरही आपलं नाव कोरलं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...