AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेयसीचा नकार पचवता आला नाही, मग प्रियकराने उचलले हे पाऊल, घटना उघड होताच जिल्ह्यात खळबळ

त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली, मात्र तिने नकार दिला. त्याला मात्र हा नकार पचवणं जड गेलं. मग संतापाच्या भरात त्याने जे केलं, त्यानंतर थेट तुरुंगच नशीबी आलं.

प्रेयसीचा नकार पचवता आला नाही, मग प्रियकराने उचलले हे पाऊल, घटना उघड होताच जिल्ह्यात खळबळ
लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीच्या मुलाला संपवलेImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 26, 2023 | 2:16 PM
Share

सुनिल थिगळे, चाकण : प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून नराधम प्रियकराने तिच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात बुडवल्याची संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली आहे. यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र चाकण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. विक्रम शरद कोळेकर असे आरोपीचे नाव आहे. खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. मुलगा गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुन्ह्याचा पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून मुलाला गरम पाण्यात बुडवले

फिर्यादी महिला पतीपासून वेगळी राहत होती. त्यानंतर तिचे विक्रम कोळेकर याच्याशी फिर्यादी महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. यातूनच विक्रमला महिलेशी लग्न करायचे होते. पण महिलेने त्याच्याशी लग्न करायला नकार दिला. यामुळे कोळेकर संतापला आणि महिलेला अद्दल घडवण्यासाठी त्याने मोठा कट रचला. त्याने प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाला बाथरुममधील गरम पाण्याच्या बादलीत बुडवले. यात मुलाची पाठ, डोके, चेहरा, पोट, पायाच्या मांड्या पूर्णपणे भाजून कातडी लालसर झाली.

जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

जखमी अवस्थेत मुलाला उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. महिलेच्या फिर्यादीवरुन चाकण पोलीस विक्रम कोळेकर याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान