CRIME NEWS : दारु पिल्यानंतर दोन मित्रांचं भांडण, ब्लेडने वार करून प्रायव्हेट पार्ट कापला

Pune News : दारु पिल्यानंतर दोन मित्रांमध्ये वाद झाला, एकाने ब्लेडने वार करुन प्रायव्हेट पार्ट कापून काढला. ज्यावेळी त्या व्यक्तीचा विहीरीत मृतदेह सापडला त्यावेळी परिसर हादरुन गेला असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

CRIME NEWS : दारु पिल्यानंतर दोन मित्रांचं भांडण,  ब्लेडने वार करून प्रायव्हेट पार्ट कापला
pune crime news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2023 | 7:56 AM

पुणे : पुण्यात (Pune Crime News) शनिवारी एक खळबळजनक घटना घडली आहे. एका मित्राने मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. दोन मित्र दारु पित असताना दोघांच्यात वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या एकाने त्या मित्रावरती ब्लेडने वार केले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. संपूर्ण पुणे (Latest Pune News in Marathi) जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरु असून अनेकांना ही घटना ऐकल्यानंतर धक्का बसला आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी त्या तरुणाचा मृतदेह सापडला त्या घटनास्थळाची पोलिस चौकशी करीत आहेत.

नेमकं काय झालं

शनिवारी दोन मित्र पिंपरी चिंचवडमध्ये एका ठिकाणी दारु पीत होते. त्यावेळी दोघांच्यात वाद सुरु झाला, ज्यावेळी दोन्हीकडून टोकाची भूमिका घेण्यात आली. त्यावेळी चिडलेल्या एका मित्राने दुसऱ्या मित्रावरती ब्लेडने वार केले. ब्लेडने जोरदार वार केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट सुध्दा कापला. मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर अजून काही गोष्टी उघडकीस येण्याची पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे.

विहिरीत सापडला मृतदेह

दोघांमध्ये दारु पित असताना एकमेकांना शिवीगाळ केली असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलिसांनी सांगितली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नावं अभिषेक उर्फ डल्या गायकवाड असं आहे. गणेश भगवान रोकडे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. विहिरीत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी अभिषेक उर्फ डल्या गायकवाड हा सोबत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे.