AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरण, दत्तात्रय गाडेबद्दल चौकशीतून हादरवणारी माहिती समोर

Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या दत्तात्रय गाडेची सध्या चौकशी सुरु आहे. गाडेवर मागच्या आठवड्यात स्वारगेट एसटी स्थानक परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सगळ्या राज्याला या घटनेने हादरवून सोडलेलं.

Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरण, दत्तात्रय गाडेबद्दल चौकशीतून हादरवणारी माहिती समोर
Pune Rape Accused
| Updated on: Mar 06, 2025 | 7:40 AM
Share

मागच्या आठवड्यात स्वारगेट एसटी स्थानक परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेने सगळ्या राज्याला हादरवून सोडलं होतं. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी 13 पथक स्थापन केली होती. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेतला. आपली सर्व शक्ती पणाला लावली व आरोपी दत्तात्रय गाडेला गावच्या शेतातून अटक केली. पोलीस लवकरच या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार आहेत. सध्या आरोपी दत्तात्रय गाडेची चौकशी सुरु आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पोलिसांचा गणवेश परिधान केलेले दत्तात्रय गाडेचे छायाचित्र पोलिसांना मिळाले आहे.

दत्तात्रय गाडेच्या मोबाइल क्रमांकाचे पोलिसांनी विश्लेषण केले. गाडेचा पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, अहिल्यानगर, सोलापूर, तसेच शिरूर एसटी स्थानकात वावर असल्याचे आढळले आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

स्वारगेट स्थानकात सुरक्षाविषयक त्रुटी

पुणे जिल्ह्यातील 14 आगारांमधील 42 बस स्थानकांपैकी स्वारगेटसह बहुतांश स्थानकांमध्ये सुरक्षाविषयक सुविधांचा अभाव असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नेमलेल्या समितीच्या सुरक्षाविषयक लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. ‘एसटी’च्या सुरक्षाविषयक लेखापरीक्षण अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

सात दिवसांत अहवाल देण्याचा आदेश

अहवाल नुकताच राज्य सरकारला सादर झाला आहे. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर बस स्थानकांमधील सुरक्षिततेचा प्रश्च चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘एसटी’ महामंडळाच्या बस स्थानकांचे सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्यासाठी समिती स्थापन करून सात दिवसांत अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यानुसार, पुणे ‘एसटी’ विभागात त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. सुरक्षा अधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी आणि आगार व्यवस्थापक यांचा या समितीमध्ये समावेश होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.