AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात अशोक खरात सारखा कारनामा; कथित अध्यात्मिक गुरू तरुणींकडून मागवायचा अर्धनग्न फोटो अन्…

पुण्यात अशोक खरात सारखा कारनामा समोर आला आहे. या कथित अध्यात्मिक गुरू तरुणींकडून अर्धनग्न फोटो मागवल्याचे समोर आलं आहे.

पुण्यात अशोक खरात सारखा कारनामा; कथित अध्यात्मिक गुरू तरुणींकडून मागवायचा अर्धनग्न फोटो अन्...
kondhawa newsImage Credit source: tv9
| Updated on: Aug 20, 2026 | 3:36 PM
Share

पुण्यात एका भोंदूबाबाचं हादरवणारं हत्याकांड उघडकीस आलं आहे. 23 वर्षीय भोंदूने तरुणीला भीती दाखवून अर्धनग्न फोटो मागवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शरीरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा दावा करून तरुणींकडून फोटो मागवायचा. या नराधमाचं कांड उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अशोक खरात सारख्या या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.

दिव्य जितेंद्र परमार असे अटक केलेल्या भोंदूबाबाचं नाव असून त्याने 22 वर्षीय तरुणीची फसवणूक केली. या भोंदूने कॉलेजमध्ये असताना स्वत:ला ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ असल्याचा सांगायचा. त्याने सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता.  सोशल मीडियावर एक चॅनेल देखील सुरू केलं होतं. खंरतर त्याने 18 व्या वर्षांपासून कांड सुरू केले होते. तो सोशल मीडियावरील कोवळ्या मुलींना हेरायचा. हाच नराधम लोकांमध्ये जाऊन व्याख्याने देखील देऊ लागला होता. तरुणी संपर्कात आल्यानंतर त्यांना व्यायामाच्या टिप्स द्यायचा. व्यायामाच्या माध्यमातून विश्वास संपादन केल्यानंतर अर्धनग्न फोटोची मागणी करायचा. तरुणींनी फोटो देण्यास नकार दिल्यास भीती दाखवायचा.

कोंढवा भागातून भोंदूबाबाला अटक 

सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तरुणींशी संपर्क साधायचा. त्याने आध्यात्मिक गुरू सांगून तरुणींशी संवाद वाढवायचा. व्यायामाच्या माध्यमातून शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकायचा, असे आमिष द्यायचा. पुण्यातील हा भोंदूबाबा मोबाईलवरून अर्धनग्न फोटो मागवायचा. अशाच एका पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली. त्याचा मोबाईल, लॅपटॉप जप्त केला आहे. आता फोटो, मेसेज,व्हिडिओच्या पुराव्याच्या आधारावर तपासणी सुरू झाली आहे. या भोंदूने आणखी किती महिला आणि तरुणींना जाळ्यात ओढले आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ओरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूला अटक केल्यानंतर आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Follow Us
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
Abhijeet Dipke | लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप, नेमकं काय घडलं?
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?