‘भाऊ-वहिनीचा तो व्हिडिओ गावातील…’, दीराने दोघांच्या जीवन संपवण्याच कारण सांगताच पोलीसही हादरले

भाऊ जसवंत सिंह आणि वहिनी नेहा राणी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता कार घेऊन घरातून निघाले होते. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होते. त्यामुळे दोघे खूप हैराण होते.

भाऊ-वहिनीचा तो व्हिडिओ गावातील..., दीराने दोघांच्या जीवन संपवण्याच कारण सांगताच पोलीसही हादरले
Dead Couple
| Updated on: Feb 19, 2025 | 12:43 PM

पदरात तीन मुलं असताना आई-वडिलांनी सरहिंग कालव्यात उडी मारुन जीवन संपवलं. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या जीवन संपवण्याच कारण समजल्यानंतर पोलीसही हैराण झाले. दोन्ही मृतदेहांच शव विच्छेदन करुन ते कुटुंबाकडे सोपवले आहेत. पंजाबच्या खन्ना भागातील हे प्रकरण आहे. सरहिंद कालव्याच्या किनाऱ्याजवळ एक कार बेवारस स्थितीत उभी आहे, अशी मंगळवारी दुपारी एका वाटसरुने पोलिसांना सूचना दिली. कारजवळ चप्पल आणि मोबाइल फोनही होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी कारच्या जवळ चप्पल आणि मोबाइल फोन पडलेला होता. कुटुंबातील सदस्य सुद्धा दोघांचा शोध घेत घटनास्थळी पोहोचले. दोघांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढले.

जसवंत सिंहचा भाऊ गुरजंट सिंहने सांगितलं की, त्याचा भाऊ जसवंत सिंह आणि वहिनी नेहा राणी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता कार घेऊन घरातून निघाले होते. काहीवेळाने दोघांनी सरहिंद कालव्यात जाऊन उडी मारली. गुरजंट सिंहने सांगितलं की, गावातील दोन-तीन लोक त्याचा भाऊ आणि वहिनीला त्रास देत होते. कारण त्यांच्याजवळ काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ होते. याच प्रकरणात जसवंत सिंह आणि नेहा राणी यांचा दुसऱ्या पक्षाविरुद्ध कोर्टात खटला सुरु आहे.

व्हायरल करण्याची धमकी

गुरजंट सिंहने सांगितलं की, “गावातील लोक भाऊ आणि वहिनीवर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते. अन्यथा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होते. त्यामुळे दोघे खूप हैराण होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून जसवंत सिंह आणि नेहा राणी या दोघांनी टोकाच पाऊल उचललं”

मुलं अनाथ झाली

जसवंत सिंह पेशाने टॅक्सी चालक होता. चांगल्या स्वभावाचा माणूस होता. पती-पत्नीच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. दोघांना तीन मुलं असून ती आता अनाथ झाली आहेत. त्यांची रडून-रडून वाईट अवस्था आहे.