सरेंडर कर, नाहीतर जामीन रद्द करू; सोनम रघुवंशीचं काही खरं नाही, कोर्टाचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाने राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशीला दोन पर्याय दिले आहेत. आता ती कोणता पर्याय निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरेंडर कर, नाहीतर जामीन रद्द करू; सोनम रघुवंशीचं काही खरं नाही, कोर्टाचा मोठा निर्णय
Sonam Raghuvanshi
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 4:40 PM

देशात राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी सोनम रघुवंशीचा जामीन काही दिवसांपूर्वी मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतर सोनम तुरुंगातून बाहेर आली होती. आता सोनमने आत्मसमर्पण करण्याचे किंवा तिचा जामीन रद्द करण्याचे आदेश कोर्टाने दिला आहे.

नेमका निर्णय काय?

कनिष्ठ न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असताना सोनमने आत्मसमर्पण करावे, असे न्यायालयाने सुचवले. त्यानंतर तिच्या जामिनावर पुनर्विचार केला जाऊ शकतो. मेघालयात हनिमूनदरम्यान पती राजा रघुवंशीच्या कथित हत्येतील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला दिलेला जामीन रद्द करण्याचा विचार न्यायालय करत असल्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि पी. बी. वराले यांचे खंडपीठ सोनमच्या सुटकेला कायम ठेवणाऱ्या मेघालय उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी करत होते.

न्यायालयाने म्हटले की, दोन पर्याय आहेत: एकतर आम्ही या प्रकरणावर विचार करून गुणवत्तेनुसार आदेश देऊ, किंवा साक्षीदारांचे जबाब आणि तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही तुम्हाला अंतरिम आत्मसमर्पण करण्याचा आदेश देऊ. आम्हाला तुम्हाला अचानक धक्का द्यायचा नाही. सोनमच्या वकिलाने तिच्या जामिनावर पुढील विचार होईपर्यंत आत्मसमर्पण करण्यास ती तयार आहे का, हे निश्चित करण्यास सांगितल्यानंतर न्यायालयाने ही टिप्पणी केली.

टायपिंगच्या एका चुकीमुळे सोनमला जामीन मिळाला

राज्य सरकारतर्फे हजर असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला की, सोनमला माहिती होते की तिची अटक का होत आहे. ही याचिका जामीन रद्द करण्याविरुद्ध नसून, जामीन मंजूर करण्याविरुद्ध आहे. त्यांनी सांगितले की, सोनमने कथित प्रेमी आणि तीन जणांसोबत मिळून मेघालयमध्ये हनीमूनदरम्यान पती राजा रघुवंशीची हत्या करण्याचा कट रचला होता.

सॉलिसिटर जनरल म्हणाले की, सह-आरोपी राज कुशवाहा याच्या अटकेनंतरच सोनमने पोलिसांसमोर सरेंडर केले. तिने यापूर्वीच्या कोणत्याही याचिकेत या वस्तुस्थितीचे खंडन केले नव्हते. मात्र, केस डायरीमध्ये खुनासाठी कलम १०३ ऐवजी चुकून ४०३ लिहिले गेले. या टायपिंग चुकीचा फायदा घेत सोनमने मेघालय उच्च न्यायालयातून जामीन मिळवला.

Follow Us