
राजस्थानच्या अलवरमध्ये लग्नाआधी एका युवकावर पोलिसांनी कारवाई केली. त्याने होणाऱ्या बायकोसोबत अशी हरकत केली, की त्याला अटक करण्यात आली. साखरपुड्यानंतर तो अचानक मुलीच्या घरी येऊन धडकला. त्यानंतर जबरदस्तीने तिच्याशी संबंध ठेवले. मुलीच्या कुटुंबियांना या बद्दल समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून युवकाला अटक करण्यात आलीय.
आदर्श नगर पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, अटक केलेल्या युवकावर होणाऱ्या बायकोवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ज्यावेळी युवकाने हे कृत्य केलं, त्यावेळी मुलीचे कुटुंबीय घरी नव्हते. मुलीचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना सत्य समजलं. त्यांनी मुलाविरोधात गुन्हा नोंदवला. त्याला अटक करण्यात आली आहे.
मुलगी सज्ञान नव्हती
पोलिसांनी सांगितलं की, ही घटना 23 जूनची आहे. आदर्श नगर पोलिसांनी सांगितलं की, एका गावातील हे सर्व प्रकरण आहे. गावात राहणाऱ्या युवतीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झालेला. मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिच लग्न करण्यात येणार होतं. किशोरी होणाऱ्या पतीसोबत फोनवर बोलायची. याची कुटुंबाला माहिती होती.
मुलीचे कुटुंबीय शेतातून परत आले
23 जूनच्या दुपारी कुटुंबातील लोक शेतावर गेले होते. यावेळी युवतीचा भावी नवरा तिला भेटण्याच्या बहाण्याने घरी आला. तिच्याबरोबर जबरदस्तीने संबंध ठेवले. काहीवेळाने मुलीचे कुटुंबीय शेतातून परत आले. भावी वर त्यांच्या भितीने घरातून पळून गेला. मुलीने तिच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितल्यानंतर पोलीसांना कळवण्यात आलं. गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आता आरोपीला अटक केलीय. मुलीच्या कुटुंबियांनी कुठलीही दया-माया न दाखवता कारवाईचा निर्णय घेतला.