गर्लफ्रेण्डशी झालेली मैत्री खटकली, दारु प्यायला बोलावून मित्राचाच काटा काढला

| Updated on: Nov 08, 2021 | 3:46 PM

हत्येच्या आधी सर्व मित्रांनी कर्मवीरच्या घरी दारु पार्टी केली होती. त्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास रोहित रक्तबंबाळ अवस्थेत धावत घरी पोहोचला. कर्मवीर, आशिष, प्रदीप यांनी आपल्याला मारहाण करुन चाकूने भोसकल्याचं रोहितने घरी सांगितलं होतं.

गर्लफ्रेण्डशी झालेली मैत्री खटकली, दारु प्यायला बोलावून मित्राचाच काटा काढला
संग्रहित छायाचित्र
Follow us on

जयपूर : राजस्थानमध्ये झालेल्या युवकाच्या हत्या प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मयत तरुण आणि आरोपी एकमेकांचे मित्र होते. मात्र आपल्या गर्लफ्रेण्डशी झालेली मैत्री खटकल्यामुळे तरुणाने मित्राचाच काटा काढला. चाकूने वार करुन त्याने मित्राची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील झुंझुनू येथील पचेरी ठाणा क्षेत्रातील रोहित नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. आरोपी प्रदीपच्या गर्लफ्रेंडशी रोहितची मैत्री झाली होती. त्यामुळे दोघांमध्ये मोठं भांडण झालं. आपल्या गर्लफ्रेण्डशी केलेल्या मैत्रीवरुन प्रदीप इतका भडकला, की त्याने मित्रांसोबत चाकूने वार करुन रोहितची हत्या केली.

मुख्य आरोपी प्रदीप अद्याप फरार

प्रदीपच्या कॉल डिटेल्सनुसार पोलिसांनी कर्मवीर आणि आशिष या दोघा तरुणांना 24 तासांच्या आत अटक करुन चौकशी केली. तेव्हा दोघांनी प्रदीपला मदत केल्याची कबुली दिली. कोशिन्द्र उर्फ रोहि‍तची चाकूने भोसकून हत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्य आरोपी प्रदीप अद्याप फरार आहे.

हत्येच्या आधी मित्रांची घरी दारु पार्टी

हत्येच्या आधी सर्व मित्रांनी कर्मवीरच्या घरी दारु पार्टी केली होती. त्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास रोहित रक्तबंबाळ अवस्थेत धावत घरी पोहोचला. कर्मवीर, आशिष, प्रदीप यांनी आपल्याला मारहाण करुन चाकूने भोसकल्याचं रोहितने घरी सांगितलं होतं. मात्र रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच रोहित गतप्राण झाला.

पचेरीचे एसएचओ बनवारी लाल यांनी सांगितले की, हत्या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी छापे टाकण्यात येत आहेत. लवकरच तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.


संबंधित बातम्या :

आयटी पार्कमध्ये गाडी भाड्याने लावा, 25 हजार कमवा, पुण्यातील 300 कारमालकांची कशी झाली फसवणूक?

पार्किंगवरुन मामाचा वाद, मध्यस्थी करणाऱ्या भाच्यावर हल्ला, भाऊबीजेलाच चार बहिणींचा ‘दादा’ हरपला

पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, गोठ्यात डांबून दोघांकडून अत्याचार