AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बालविवाह, पण तारुण्यात दुसऱ्यावर जीव जडला, तिच्यासोबत जे घडलं ते मन हेलावणारं

मुलीचा बालपणीच विवाह झाला होता. पण मुलगी सासरी जायला तयार नव्हती. तसेच सतत फोनवर दुसऱ्या तरुणाशी बोलायची. आईने खूप समजावले पण ऐकत नव्हती.

बालविवाह, पण तारुण्यात दुसऱ्यावर जीव जडला, तिच्यासोबत जे घडलं ते मन हेलावणारं
कौटुंबिक वादातून पुतण्याने चौघांना संपवलेImage Credit source: TV9 Network
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 04, 2023 | 11:35 PM
Share

अजमेर : मुलगी फोनवर एका तरुणाशी बोलायची म्हणून आई आणि भावाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता. अनेकदा समजावूनही मुलगी फोनवर बोलणे बंद करत नव्हती. यामुळे संतापलेल्या आईने भावाच्या मदतीने तिला संपवले. मन हेलावणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. शांती बेगम आणि हनिफ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

मुलीची हत्या केल्यानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार दिली

तरुणीच्या कुटुंबीयांनी 26 एप्रिल रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीनंतर फिर्याद नोंद करत तपास सुरु केला. यानंतर 29 एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह आढळला. नातेवाईकांनी तरुणीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याचीही शंका व्यक्त केली होती. पोलिसांनी जेव्हा हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा पोलिसांना घरच्यांवर संशय आला.

चौकशीत आई आणि भावावर संशय आला

पोलिसांनी नातेवाईकांचीही चौकशी सुरु केली. चौकशीत मुलीचा भाऊ आणि आई दोघांच्या जबाबात तफावत होती. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आईची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. मुलीचा बालपणीच विवाह झाला होता. मात्र ती सासरी जाण्यास तयार नव्हती. मुलगी दुसऱ्या तरुणासोबत फोनवर बोलायची. तिला अनेकदा समजावले मात्र ती ऐकत नव्हती. यामुळे तिची हत्या केल्याची कबुली आईने दिली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?