13 वर्षांच्या विद्यार्थ्यापासून 23 वर्षीय शिक्षिका गर्भवती, ‘त्या’ प्रकरणी मोठं सत्य समोर येणार; आता लवकरच…

विद्यार्थ्यांवर शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार करणाऱ्या एका 23 वर्षीय शिक्षिकेचा हादरवून टाकणारा कारणामा समोर आला आहे. या शिक्षिकेने आपल्या 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबतच वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत.

13 वर्षांच्या विद्यार्थ्यापासून 23 वर्षीय शिक्षिका गर्भवती, त्या प्रकरणी मोठं सत्य समोर येणार; आता लवकरच...
rajasthan female teacher and student
| Edited By: | Updated on: May 16, 2025 | 6:43 PM

Crime News : विद्यार्थ्यांवर शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार करणाऱ्या एका 23 वर्षीय शिक्षिकेचा हादरवून टाकणारा कारणामा समोर आला होता. या शिक्षिकेने आपल्या 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबतच वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. विशेष म्हणजे मुलाचे शोषण केल्यानंतर ही शिक्षिका गर्भवती राहिली. त्यानंतर या शिक्षिकेने विद्यार्थ्याला सोबत घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर या शिक्षिकेचा गर्भपात करण्यात आला असून, गर्भाची तसेच अल्पवयीन मुलाची डीएनए चाचणी केली जाणार आहे.

नेमकी घटना काय?

समोर आलेला हा धक्कादायक प्रकार गुजरात राज्यातील सुरत येथील आहे. न्यायालयाने या महिला शिक्षिकेचा गर्भपात करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार सुरतमधील एसएमआयएमईआर या शासकीय रुग्णालयात शिक्षिकेचा गर्भपात करण्यात आला आहे. या महिलेच्या पोटात 22 आठवड्यांचा म्हणजेच साधारण पाच महिन्यांचा गर्भ होता. गर्भवती राहिल्यानंतर या शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्याला सोबत घेत पळ काढला होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन मुलापासून गर्भवती राहिल्याचे या शिक्षिकेने कबुल केले आहे.

गर्भ आणि मुलाची डीएनए चाचणी होणार

विशेष म्हणजे अल्पवयीन विद्यार्थ्यानेदेखील महिला शिक्षिकेसोबत अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या 13 वर्षीय अल्पवयी मुलाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. या चचणीतून संबंधित मुलगा हा प्रजननास सक्षम असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार महिलेच्या पोटातील गर्भ तसेच अल्पवयीन पीडित मुलाची डीएनए चाचणी केली जाणार असून शिक्षिकेच्या पोटातील गर्भ अल्पवयीन मुलाचाच आहे का? हे तपासले जाणार आहे.

मुलाचे शोषण नेमके कसे झाले?

मिळालेल्या माहितीनुसार गर्भवती राहिलेली 23 वर्षीय शिक्षिका सुरतमधील 13 वर्षीय विद्यार्थ्याची शिकवणी (ट्यूशन) घ्यायची. 23 एप्रिल रोजी ही शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्याला घेऊन फरार झाली होती. या दोघांचाही शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथकं स्थापन करण्यात आली होती. पाच दिवसांच्या शोधानंतर 30 एप्रिल रोजी हे दोघेही जयपूरमध्ये एका खासगी बसमध्ये सापडले होते.

दोन वर्षांपासून चालू होते शोषण

पोलिसांनी या दोघांचीही कसून चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून 23 वर्षीय शिक्षिका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करत होती. या शिक्षिकेला नुकतेच समजले की ती गर्भवती आहे. त्यानंतर तिने विद्यार्थ्याला सोबत घेत पळून जाण्याचा निर्णय घेतला. पीडित विद्यार्थी इयत्ता 5 वीमध्ये असल्यापासून ही शिक्षिका त्याची शिकवणी घ्यायची. अगोदर ही शिक्षिका विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याचे ट्यूशन घ्यायची. नंतर मात्र ती संबंधित विद्यार्थ्याला तिच्या घरी बोलवू लागली. याच काळात लैंगिक शोषणाच्या माध्यमातून दोन वर्षांच्या काळात या दोघांमध्ये अनेकवेळा शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्यातुनच पुढे ही शिक्षिका गर्भवती राहिली.