रेखा जरे हत्याप्रकरण: आरोपी बाळ बोठेला मदत करणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून अटक

| Updated on: Dec 25, 2020 | 9:39 PM

पोलीस सध्या बाळ बोठे याचा कसून शोध घेत आहेत. याच कारवाईदरम्यान पोलिसांनी शुक्रवारी पुण्यातून निलेश शेळके याला ताब्यात घेतले. |

रेखा जरे हत्याप्रकरण: आरोपी बाळ बोठेला मदत करणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून अटक
Rekha Jare Murder Case
Follow us on

अहमदनगर: रेखा जरे हत्याप्रकरणाच्या (Rekha Jare Murder case) तपासात पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. पोलिसांकडून शुक्रवारी या प्रकरणातील फरार आरोपी बाळ बोठे (Bal Bothe) याला मदत करणाऱ्या संशयिताला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. या संशयिताकडून बाळ बोठेच्या ठावठिकाण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. (Rekha Jare murder case Police got Major breakthrough)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशयिताचे नाव निलेश शेळके असे आहे. निलेश शेळके हा डॉक्टर असून तो गेल्या अडीच वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर नगरमधील बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

पोलीस सध्या बाळ बोठे याचा कसून शोध घेत आहेत. याच कारवाईदरम्यान पोलिसांनी शुक्रवारी पुण्यातून निलेश शेळके याला ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक बाळ बोठेला पकडण्यासाठी गेले होते. तेव्हा निलेश शेळके पोलिसांच्या हाती लागला.

बाळ बोठे याने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. मारेकऱ्यांनी याबाबतची कबुली दिल्यानंतर बाळ बोठे फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बाळ बोठेला तपासण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी केली होती. मात्र, तरीही बाळ बोठे कुठे लपून बसला आहे, याचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही. या सर्व कालावाधीत निलेश शेळके याने बाळ बोठेला मदत केल्याचा पोलिसांना संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या:

Special Report | बाळ बोठेचा लॉक मोबाईल पोलिसांच्या हाती, रेखा जरे प्रकरण अनलॉक होण्याची शक्यता

बाळ बोठेचा लॉक्ड मोबाईल करणार हत्याकांडाचं प्रकरण अनलॉक?

Special Report | रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेला कोर्टाचा दणका, आता बोठेपुढं दोनच पर्याय

(Rekha Jare murder case Police got Major breakthrough)