AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा जरे हत्याकांड, आरोपी बाळ बोठेचा फैसला पोलिसांसाठी महत्त्वाचा का?

कोर्टाने फरार आरोपी बाळ बोठेला दणका दिला, तर पोलिस त्याला शोधण्याची मोहीम आणखी कडक करतील

रेखा जरे हत्याकांड, आरोपी बाळ बोठेचा फैसला पोलिसांसाठी महत्त्वाचा का?
| Updated on: Dec 16, 2020 | 12:07 PM
Share

अहमदनगर : ‘यशस्विनी ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठेला अटक होते की त्याला जामीन मिळतो, याचा फैसला आज होणार आहे. अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालय हा निर्णय देणार आहे. बाळ बोठेने वकिलामार्फत कोर्टाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर मंगळवारी (15 डिसेंबर) सुनावणी झाली. या सुनावणीत बाळ बोठेचे वकील अॅड. महेश तवले यांनी बाळ बोठेच्या बाजूने युक्तिवाद केला. तर सरकारी वकील सतीष पाटील यांनी बाळ बोठेला जामीन दिला जाऊ नये, अशी विनंती करत तवलेंचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. (Why arresting Bal bothe in Rekha Jare Murder case is important for Police)

हनी ट्रॅप वृत्तमालिकेमुळेच बाळ बोठेंना प्रकरणात गोवलं- अॅड. महेश तवले

बाळ बोठेंचे वकील महेश तवलेंनी या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला. आणि हनी ट्रॅपमुळेच बाळ बोठेला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं महेश तवले म्हणाले. बाळ बोठे पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी वृत्तपत्रात हनीट्रॅपची मालिका चालवली. या वृत्तमालिकेत त्यांनी सागर भिंगारदिवेचं नाव घेतलं. सागर भिंगारदिवे हाच हनीट्रॅपचा मास्टरमाईंड असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यामुळेच त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद अॅड. महेश तवलेंकडून करण्यात आला.

हत्याकांडाच्या दिवशी बोठे भिंगारदिवे आणि जरेंच्या संपर्कात कशासाठी?- सरकारी वकील

हनीट्रॅपमधून जर बाळ बोठेला फसवण्यात आलं असेल तर मग सागर भिंगारदिवे आणि बाळ बोठेमध्ये इतक्या बैठका का झाल्या? हत्याकांडाच्या दिवशी बाळ बोठे सागर भिंगारदिवेशी संपर्कात कसा? आणि त्याच वेळी बाळ बोठेने रेखा जरेंना इतके फोन कशासाठी केले? असे प्रश्न विचारत सरकारी वकील सतीष पाटील यांनी तवलेंचा युक्तिवाद खोडून काढला. हनीट्रॅपबाबत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. हॅनीट्रॅपची पोलिसांनी चौकशीही केलेली नाही. त्यामुळे हत्याकांडाचा आणि हनीट्रॅपचा काहीही संबंध नसल्याचा दावा पाटील यांनी केला. (Why arresting Bal bothe in Rekha Jare Murder case is important for Police)

कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज निर्णय येणार आहे. या निर्णयाकडे सगळ्या अहमदनगर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. कोरोना संकटानंतर कोर्टात गर्दी पाहायला मिळत नव्हती. मात्र, या प्रकरणामुळं कोर्टात लोकांची गर्दी वाढू लागली आहे. बाळ बोठे हा शहरातील प्रतिष्ठीत पत्रकार होता, त्यामुळं शहरात याच्या रंजक चर्चा रंगू लागल्या आहेत.

बाळ बोठेच नाही, तर पोलिसांसाठीही आजचा निर्णय महत्त्वाचा!

कोर्टाने बोठेच्या बाजूने निर्णय दिल्यास, त्याला मोठा दिलासा मिळेल, आणि तो कायद्याच्या आधारे बाहेर राहून ही केस लढू शकेल. मात्र जर कोर्टाने बाळ बोठेला दणका दिला, तर पोलिसांचे हात आणखी मजबूत होतील आणि फरार बाळ बोठेला शोधण्याची मोहीम आणखी कडक केली जाईल. त्यामुळेच आजचा निर्णय बाळ बोठेसाठीच नाही, तर पोलिसांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

संबंधित बातम्या :

जातेगावच्या घाटात हिरो झालेला बाळा बोठे, जातेगावच्या घाटातच व्हिलन कसा झाला?

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?

(Why arresting Bal bothe in Rekha Jare Murder case is important for Police)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.