Sonali Phogat | भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या घरी चोरी, 10 लाख रोकड, दागिने लंपास

सोनाली फोगाट यांच्या हिसार येथील घरुन लाखो रुपयांचे दागिने, रोकड आणि लाइसेन्स बंदूकची चोरी झाली.

Sonali Phogat | भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या घरी चोरी, 10 लाख रोकड, दागिने लंपास
सोनाली फोगाट

चंदीगड : भारतीय जनता पक्षाची (BJP) नेत्या आणि बिग बॉस-14 च्या स्पर्धक सोनाली फोगाट (Robbery At BJP Leader Sonali Phogat House) यांच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली आहे. त्यांच्या हिसार येथील घरुन लाखो रुपयांचे दागिने, रोकड आणि लाइसेन्स बंदूकची चोरी झाली. सोनाली फोगाट यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे (Robbery At BJP Leader Sonali Phogat House).

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या घटनेतील चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणाच्या तपासासाठी फिंगर एक्सपर्ट टीमला पाचारण करण्यात आलं आहे. त्याशिवाय, पोलिसांनी जवळपासच्या लोकांकडेही चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.

सोनाली फोगाट यांनी तक्रारीत काय म्हटलं?

सोनाली फोगाट यांनी दिलेल्या तक्रारी पोलिसांनी सांगितलं, 9 फेब्रुवारीला त्या संतनगर येथील त्यांच्या घराला कुलुप लावून चंडीगडला गेल्या होत्या. जेव्हा त्या सोमवारी 15 फेब्रुवारीला घरी परतल्या तेव्हा त्यांच्या घराचं कुलुप तुटलेलं होतं. त्यांनी तात्काळ घरात जाऊन पाहिलं. त्यांनी त्यांच्या घरातील सामान बघितलं तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचं कळालं. चोरांनी 10 लाख रुपये रोकड, सोनं आणि चांदीचे दागिने, घड्या आणि लाइसेन्स रिव्हॉल्वर आणि आठ काडतुसे चोरी केल्या (Robbery At BJP Leader Sonali Phogat House).

फोगाट यांनी तक्रारीत म्हटलं, घरुन बरंच सामान चोरीला गेलं आहे आणि त्या घरचे सर्व सामान तपासून एक यादी देतील. त्यांच्या घरी सीसीटीव्ही लावलेले आहेत, पण चोरांनी घरातून डीव्हीआरही गायब केला आहे.

Robbery At BJP Leader Sonali Phogat House

संबंधित बातम्या :

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात नवनवे खुलासे, ग्राहक हादरले, अफरातफर करणारा रोखपाल मोकाट?

केजरीवालांच्या कन्येची 34 हजारांना फसवणूक, तिघांना अटक, मास्टरमाईंड परागंदा

आईची नजर हटताच भामट्याने चिमुकलीला पळवलं, 24 तास उलटूनही शोध नाही

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI