AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांना प्रतिकार करताना शेतकरीच…

नगरमध्ये सशस्त्र दरोड्याची घटना सोमवारी रात्री घडली. दरोडेखोरांची चाहूल लागताच शेतकऱ्याने त्यांच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.

नगरमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांना प्रतिकार करताना शेतकरीच...
नगरमध्ये सशस्त्र दरोडाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 14, 2023 | 9:55 AM
Share

अहमदनगर / कुणाल जयकर : श्रीगोंदे तालुक्यातील बेळवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरणगाव दुमाला येथे सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोड्याची घटना घडली. यावेळी दरोडेखोरांचा प्रतिकार करताना मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून, भीतीचे वातावरण आहे. दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह काही कागदपत्रे लंपास केली. कल्याण गायकवाड असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बेळवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दरोडेखोरांना शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

अरणदुमला येथे मध्यरात्री दरवाज्याला धक्का देऊन दरवाजा तोडून दरोडेखोर आतमध्ये शिरले. दरवाज्याच्या आवाजाने गायकवाड यांना जाग आली. त्यांनी दरोडेखोरांचा डाव हाणून पाडण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आले नाही. अखेर दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

जाड केबलने मारहाण केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आरणगाव शिवारामध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कल्याण गायकवाड यांच्या घरी चार अज्ञात दरोडेखोर घुसले. सोन्याचे दागिने तसेच पाच हजार रुपये घेऊन पोबारा केला. यावेळी चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या कल्याण गायकवाड यांना जाड केबलने चोरट्यांनी मारहाण केली. यात उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच अहमदनगर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेतली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी केली होती, मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या घटनेमुळे आरणगाव परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?