सांगलीतील राष्ट्रवादी कार्यकर्ता हत्या प्रकरण, मुख्य सूत्रधाराला अखेर बेड्या ठोकल्या !

| Updated on: Jun 26, 2023 | 3:55 PM

सांगलीतील बहुचर्चित नालसाब मुल्ला हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे.

सांगलीतील राष्ट्रवादी कार्यकर्ता हत्या प्रकरण, मुख्य सूत्रधाराला अखेर बेड्या ठोकल्या !
कौटुंबिक वादातून सासूने सुनेला संपवले
Follow us on

सांगली : सांगलीतील बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता नालसाब मुल्ला हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. सच्या उर्फ सचिन डोंगरे असे आरोपीचे नाव असून त्याला कळंबा कारागृहातून अटक करण्यात आली आहे. डोंगरे कळंबा कारागृहातूनच हत्येचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच या हत्याकांड प्रकरणी त्याने तब्बल 22 वेळा कारागृहातून कॉल केल्याचेही तपासात उघड झाले आहे. सचिन डोंगरेला न्यायालयाने 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, डोंगरेला मोबाईल पुरवणारे गुन्हेगारही आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

मुल्लाच्या हत्येसाठी कारागृहातून 22 वेळा फोन

सचिन डोंगरे हा मोक्का अंतर्गत कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. डोंगरे कारागृहातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र त्याचे प्रयत्न यशस्वी होऊ नये आणि तो कारागृहातून बाहेर पडू नये यासाठी नालसाब मुल्ला प्रयत्न करत होता. याच कारणातून डोंगरेने कळंबा कारागृहात मुल्लाच्या हत्येचा कट रचला आणि यशस्वी केला. डोंगरेने यासाठी कारागृहात 22 वेळा कॉल केले. यासाठी चार मोबाईल वापरल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. एकच सिमकार्ड चार वेगवेगळ्या मोबाईलमध्ये घालून त्याने 22 कॉल केले. मुल्लाने चायनीज मेड मोबाईलचा वापर केला होता.

नालसाब मुल्ला हत्या प्रकरणी याआधी सनी कुरणे, विशाल कोळपे, स्वप्निल मलमे, रोहित मंडले, प्रशांत उर्फ बबलू चव्हाण, ऋत्विक माने या सहा जणांना अटक करण्यात आली होती. डोंगरे कारागृहात हल्लेखोरांच्या संपर्कात होता. नासलाब मुल्ला याची 17 जून रोजी डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा