AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझेंना बळीचा बकरा कोणी बनवलं? NIA कोर्टात मोठं विधान

मला बळीचा बकरा बनवण्यात आलंय, असा दावा सचिन वाझेंनी एनआयए कोर्टात केला. Sachin Vaze NIA Court

सचिन वाझेंना बळीचा बकरा कोणी बनवलं? NIA कोर्टात मोठं विधान
सचिन वाझे
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 25, 2021 | 7:12 PM
Share

मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडेलेल निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला बळीचा बकरा बनवण्यात आलंय, असा दावा त्यांनी एनआयए कोर्टात केला. सचिन वाझेंनी हा दाव केल्यानं या प्रकरणी मोठा कट असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणाची माहिती इतर व्यक्तींना असू शकते, असं सचिन वाझेंनी एनआयए कोर्टात केलेल्या दाव्यावरुन स्पष्ट होते. सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात लेखी बाजू  मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी केल्याची माहिती आहे. (Sachin Vaze Statement in NIA Court about Antilia Bomb Scare)

सचिन वाझेंवर यूएपीएअंतर्गत कारवाई

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएनं सचिन वाझेंची कोठडी संपण्यास एक दिवस बाकी असताना UAPA कायद्यातील कलम लावलं आहे. 14 मार्चला एनआयएनं सचिन वाझेंना अटक केली होती. ठाणे कोर्टानं मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही एटीएसकडून एनआयएला देण्यासं सांगितलं आहे. त्यामुळे एटीएसनं आतापर्यंत जो तपास केला होता, जे पुरावे गोळा केले होते. ते सर्व एनआयएला द्यावे लागणार आहेत.

वाझेंच्या घरी 62 जिवंत काडतुसं

सहायक निरीक्षक सचिन वाझें भोवतीचा फास आणखीनच आवळला गेला आहे. वाझेंच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली आहेत. ही काडतुसे घरात का ठेवली होती? याचे उत्तर वाझे देत नसल्याचं एनआयएने विशेष कोर्टाला सांगितलं आहे. त्यामुळे वाझेंकडे ही काडतुसे आली कुठून? आणि त्यांनी ही काडतुसे का ठेवली आहेत? याबाबतचं गूढ वाढलं आहे.

वाझेंकडून तपासात सहकार्य नाही

यावेळी एनआयएने सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं कोर्टाला सांगितलं. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली आहे. त्याशिवाय वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे. तसेच वाझेंच्या गाडीतून मिळालेले पुरावे फोरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांचे सँपल घेण्यात आले आहेत. शिवाय आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आरोपीने 12 लाख रूपये दिले होते. त्याचीही माहिती घ्यायची असल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलं आहे. याशिवाय वाझेंच्या आवाजाचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

सचिन वाझेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; 3 एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ

VIDEO | मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर

(Sachin Vaze Statement in NIA Court about Antilia Bomb Scare)

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला