AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : मोठा खुलासा, सलमान खानवर AK-47 मधून गोळ्या झाडायच्या होत्या; 4 शूटर गजाआड

बॉलिवूडचा दबंग स्टार, अभिनेता सलमान खान याच्या घरावर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर असतानाच सलमानला लक्ष्य करण्याचा बिश्नोई गँगचा प्लान होता. त्यासाठी पाकिस्तामधून शस्त्र मागवून त्या स्वंयचलित शस्त्रांनी हल्ला करण्याचाही कट आखण्यात आला होता.

Salman Khan : मोठा खुलासा,  सलमान खानवर AK-47 मधून गोळ्या झाडायच्या होत्या; 4 शूटर गजाआड
सलमान खान
| Updated on: Jun 01, 2024 | 2:03 PM
Share

बॉलिवूडचा दबंग स्टार, अभिनेता सलमान खान याच्या घरावर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता. त्यासंदर्भात कसून तपास करत पोलिसांनी चौघांना अटक केली होती. तर दोनच दिवसांपूर्वी या हल्ल्यासाठी नेमबाजांना मदत केल्याप्रकरणी चंदिगड पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील तिघांना बेड्या ठोकल्या. दोन महिन्यांपासून हे प्रकरण गाजत असून आता नवे अपडेट्स समोर आले आहेत. आता याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी पनवेल येथीन चार शूटर्सना अटक केली आहे.

चौघांना अटक, खळबळजनक माहिती उघड

धनंजय सिंह तपे सिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया, वस्पी खान उर्फ वसीम चिकना आणि जीशान खान उर्फ जावेद खान अशी या चार शूटर्सची नावं आहेत. एवढंच नव्हे तर हे चौघेही शूटर्स लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचेही समोर आला आहे.

गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी या चौघांनी सलमानयाच्या पनवेल येथील फार्महाऊसची व आसपासच्या परिसराची रेकी केली अशी माहितीदेखील समोर आली. पनवेल येथील फार्महाऊसवर असतानाच सलमानला लक्ष्य करण्याचा बिश्नोई गँगचा प्लान होता. त्यासाठी पाकिस्तामधून शस्त्र मागवून त्या स्वंयचलित शस्त्रांनी हल्ला करण्याचाही कट आखण्यात आला होता, अशी माहिती उघड झाली आहे. एकंदरच या माहितीमुळे मोठी खळबळ माजली आहे.

पोलिसांना मिळाले व्हिडीओज

मिळालेल्या माहितीनुसार, या चारही शूटर्सना Ak 47 सह इतर अनेक शस्त्रास्त्रांनी फायरिंग करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांना त्या आरोपींच्या मोबाईलमधून अनेक व्हिडीओजही सापडले आहेत. सलमानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तामधून शस्त्र मागवून त्या स्वयंचलित शस्त्रांनी हल्ला करण्याचाही कट आखण्यात आला होता. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, श्नोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार यासह 17हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

चंदीगड पोलिसांनी तिघांना केली अटक

रविवार, १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार केला आणि ते पळून गेले. बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कसून तपास करत दोन्ही हल्लेखोरांना गुजरातच्या भुज येथून अटक केली होती. तर दोन्ही शूटर्सना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी पंजाब येथून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांनाही बेड्या ठोकल्या. एकूण चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याप्रकरणातील एका आरोपीने अनुज थापन याने गेल्या महिन्यात पोलिस कोठडीत गळफास लावून आयुष्य संपवलं आणि आणखी मोठी खळबळ माजली. याप्रकरणाचा तपास अद्याप सुरूच असून दोनच दिवसांपूर्वी चंदिगड पोलिसांनी बिश्नोई गँगमधील आणखी तिघांना बेड्या ठोकल्या. गोळीबार करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या नेमबाजांना मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

सलमानच्या फार्म हाऊसचीही केली रेकी

मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्याआधीच शूटर्सनी चार वेळा सलमान खानच्या घराची रेकी केली होती. एवढंच नव्हे तर त्यांनी एकदा सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवरही पाळत ठेवली होती. मात्र बऱ्याच काळापासून सलमान फार्महाऊसवर आलाच नव्हता त्यामुळे हल्लेखोरांनी त्याच्या वांद्रे येथील घरावरच गोळीबार करण्याचा प्लान आखला. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल हे मुंबईत आल्यावर अज्ञात व्यक्तींकडून पुरवण्यात आले होते. तर खर्चासाठी लागणारे पैसेही अनोळखी व्यक्तीने दिले होते. त्याचबरोबर घर भाड्याने घेण्यासाठी अनोळखी व्यक्तीने मध्यस्थी केली होती. सलमान खानच्या घरावर गोळीबार होण्याच्या काही तास आधी शूटर्सना बंदूक पुरवण्यात आली होती. या बंदुकीचा पुरवठा 13 एप्रिलच्या रात्री वांद्रे भागात करण्यात आला आणि 14 एप्रिलच्या पहाटे दोन्ही शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला.

सलमानला घाबरवण्यासाठीच बिश्नोई गँगकडून आरोपींना त्याच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. कमीत कमी दोन मॅगझीन घरावर फायर करण्याचे टारगेट दोन्ही आरोपींना देण्यात आलं होत. 2 मॅगेझिन अर्थात 12 गोळ्या फायर करा, असे आदेश हल्लेखोरांना देण्यात आले होते. मात्र, हल्लेखोरांना 12 गोळ्या फायर करता आल्या नाहीत. दोन्ही आरोपींना कामासाठी आधी 1 लाख मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर येत आहे. काम फत्ते झाल्यावर आरोपींना नंतर आणखी 3 लाख मिळणार होते.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है