AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, डॉक्टर भावाला लहान भावानं आयुष्यातून संपवलं; नात्यात नेमकं काय घडलं?

सांगलीमधील कुपवाड शहरात सकाळच्या दरम्यान घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी का झाला ? यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, डॉक्टर भावाला लहान भावानं आयुष्यातून संपवलं; नात्यात नेमकं काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 26, 2023 | 12:51 PM
Share

सांगली : सांगलीच्या कुपवाड शहर हादरले आहे. सख्खा भाऊच पक्का वैरी झाल्याचं समोर आले आहे. सांगलीमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाने आपल्या डॉक्टर असलेल्या भावाला आयुष्यातून कायमचे संपवून टाकले आहे. तर डॉक्टरांचा खून झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिल बाबाजी शिंदे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुपवड पोलिसांनी याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अनिल शिंदे यांचा सख्खा भाऊ संशयित आरोपी संपत बाबाजी शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

संपत शिंदे यांने सकाळी डॉक्टर भाऊ अनिल शिंदे याच्यावर धारधार शस्राने वर करून हत्या केली आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची पोलिसांकडून प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

या हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी कुपवाड पोलीस निरीक्षक अविनाश पाटील पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले आहेत. तर संशयित आरोपी संपत बाबाजी शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या हत्येच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असतांना सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याची जिल्ह्यात चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान पोलिसांनी डॉ. अनिल शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यामध्ये कौटुंबिक कारण समोर आले असले तरी पोलिसांच्या तपासात कोणते कारण समोर येतं ही पाहणं देखील महत्वाचे आहे. कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच संशयिताला ताब्यात घेतल्याने तपास करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?