दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष, 83 लाखांची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

या चौघा संशयितांनी शहरात रिचआधार मल्टी ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्स एल. एल. पी. नावाची कंपनी स्थापन केली होती. यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष,  83 लाखांची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
sangli policeImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 11:08 AM

सांगली : सांगली शहरातील (sangli) रिचआधार मल्टी ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास एका ठराविक कालावधीनंतर रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सांगलीसह सोलापूर (solapur) येथील सहा गुंतवणूकदारांची तब्बल ८३ लाख ४८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या चौघांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने (sangli police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिचआधार कंपनीचा संचालक सतीश काका बंडगर, जयश्री सतीश बंडगर, संतोष काका बंडगर आणि अनिल मारुती आलदर (रा. सांगली ) यांचा समावेश आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून पोलिस आरोपींच्या शोधात होते. ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिस कसून चौकशी करणार आहेत.

चौघा संशयीतांनी रक्कम देण्यास टाळाटाळ

या चौघा संशयितांनी शहरात रिचआधार मल्टी ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्स एल. एल. पी. नावाची कंपनी स्थापन केली होती. यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्याला बळी पडून तक्रारदार याने कंपनीत गुंतवणूक केली. परंतु दिलेल्या मुदतीत कोणताच परतावा न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही कंपनीतील चौघा संशयीतांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली.

हे सुद्धा वाचा

आर्थिक फसवणूकीची व्याप्ती अधिक

त्यामुळे तक्रारदाराने सांगली शहर पोलीस ठाण्यात संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्याप्रमाणेच कंपनीत गुंतवणूक केलेल्या संतोष नांमदेव सुरवसे (रा. जवळा ता. सांगोला, जि. सोलापूर ) यांची २३ लाख ५० हजार, प्रविण दिपक कचरे (रा. श्रीपुर ता. माळशिरस जि. सोलापूर) यांची ११ लाख २६ हजार, संगिता चंद्रकांत नलवडे (रा. आमणापुर ता. पलुस जि. सांगली) यांची ११ लाख १० हजार, सागर गिरी गोसावी (रा. अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर) यांची ३ लाख ५ हजार, अनिल एकनाथ सुर्यवंशी (रा. लंगरपेठ ता. कवठेमहांकाळ) यांची ८ लाख ५७ हजार ५०० रुपये अशी एकूण सहा ठेवीदारांची ८३ लाख ४८ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. आर्थिक फसवणूकीची व्याप्ती अधिक असल्याने सदर गुन्हा पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या निर्देशाने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.