डबल मर्डरने सांगली हादरलं, दोन गट आपसात भिडले, दोघांचे मुडदे पडले

| Updated on: Mar 09, 2022 | 9:31 PM

आता सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कारण चॅटिंगपासून सुरू झालेलं हे प्रकरण चक्का मर्डरपर्यंत (Sangli murder) पोहोचलंय.  सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे मध्यरात्री 12 वाजता मंगळवेढा रोडवर दोन गटात तुफान हाणामारी (Sangli Crime) झाली आहे.

डबल मर्डरने सांगली हादरलं, दोन गट आपसात भिडले, दोघांचे मुडदे पडले
सांगलीत डबल मर्डर
Image Credit source: tv9
Follow us on

सांगली : मोबाईलने तुमचे आमचे काम सोपे केले आहे. मात्र कधी कधी हे मोबाईलचे वाद एवढे पराकोटीला (Mobile Chatting) जातात की ते जीवावर बेततात. आपण याआधीही अशा अनेक घटना पाहिल्या आहेत. आता सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कारण चॅटिंगपासून सुरू झालेलं हे प्रकरण चक्क मर्डरपर्यंत (Sangli murder) पोहोचलंय.  सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे मध्यरात्री 12 वाजता मंगळवेढा रोडवर दोन गटात तुफान हाणामारी (Sangli Crime) झाली आहे. या हाणामारीत दोन तरुणांचा खून झाला आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. तर या प्रकरणाने पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे. या हाणामारीत जखमी झालेल्या एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. यांना सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तरुणाला दाखल करण्यात आले आहे. सोशल मिडीयावर चॅटींग केल्याचे राग मनात धरून तरुणांचा खून केले अल्याचा प्राथमीक अंदाज आहे.

पोलिसांनी सात जणांना घेतलं ताब्यात

यामध्ये सात संशयित आरोपीं सध्या पोलिसाच्या ताब्यात आहेत. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत. उमदी येथे खून दोन जण मयत एक गंभीर जखमी या घटनेत मयत झालेल्या गुंडा उर्फ मदगोंडा बगली व संतोष राजकुमार माळी असे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या प्रकाश परगोंड याला सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मोबाईल चँटींग वरून ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. मात्र याचे ठोस कारण पोलीस तपासानंतरच समोर येईल.

मारामारी कशी झाली?

घटनेत दगड, काठी व चाकूचा वापर केल्याचे समजते. उमदी पासून दोन किलोमीटर अंतरावर उमदी ते पंढरपूर मंगळवेढा हायवेवर ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमदी पोलीस करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, एलसीबीचे सर्जेराव गायकवाड, प्रशांत निशानदार,जतचे उपअधीक्षक रत्नाकर नवले व टीम घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या. अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे करीत आहेत. या घटनेने पोलीस प्रशासनही हादरून गेले आहे. दोन गटातली मारामारी किती पराकोटीला जाऊ शकतो आणि किती धोकादायक ठरू शकते हे या घटनेवरून लक्षात यतंय.

घरातच सुरु होता देहविक्रीचा काळाधंदा! ग्राहक बनून गेलेले पोलिस, वास्तव पाहून चक्रावले!

Video : बांधाच्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा; घटना कॅमेरात कैद

Pune crime | पुण्यात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी ; नेमकं काय घडलं