घरातच सुरु होता देहविक्रीचा काळाधंदा! ग्राहक बनून गेलेले पोलिस, वास्तव पाहून चक्रावले!

पोलिसांनी घरातच सुरू असलेल्या दहविक्रीच्या (Delhi Crime) व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाने पोलीसही चक्रावून (Delhi police) गेले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एक तरुण आणि चार महिलांना अटक केली आहे.

घरातच सुरु होता देहविक्रीचा काळाधंदा! ग्राहक बनून गेलेले पोलिस, वास्तव पाहून चक्रावले!
दिल्लीत घरातच देहविक्रीImage Credit source: Amar ujala
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 7:40 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील शाहदरा भागातील सीमापुरी येथे एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कारण पोलिसांनी घरातच सुरू असलेल्या दहविक्रीच्या (Delhi Crime) व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाने पोलीसही चक्रावून (Delhi police) गेले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एक तरुण आणि चार महिलांना अटक केली आहे. प्रिन्स हा या टोळीचा म्होरक्या आहे तर एक 38 वर्षीय महिला (lady Arrested)  आणि 20 ते 30 वयोगटातील तीन मुली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींबाबत माहिती समोर आली आहे. सुरूवातील बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी या आरोपींना पकडले आहे. हा धंदा किती दिवसांपासून सुरू होता याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. शाहदरा जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त आर. सत्यसुंदरम यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमापुरी येथील बी-84/4 दिलशाद कॉलनी येथील घरात शरीरविक्रीचा धंदा सुरू असल्याची माहिती रविवारी मिळाली होती. याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. यानंतर संयुक्त पथक तयार करून दिलशाद कॉलनीत पोलिस पाठवण्यात आले. त्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

कसे रंगेहात पकडले?

सुरूवातील पोलिसांनी बनावट ग्राहकाला प्रथम खात्री करण्यास सांगितले.बनावट ग्राहकाने घर गाठले आणि दरवाजा ठोठावला. त्यानंतर प्रिन्स नावाचा तरुण बाहेर आला. त्याच्याशी बोलून आरोपीने दोन हजारात सौदा करून बनावट ग्राहकाला घरात बोलावले. तेथे त्याची एका 38 वर्षीय महिलेशी ओळख करून देण्यात आली. यानंतर महिलेने तीन तरुणींना बनावट ग्राहकासमोर उभे केले. ग्राहकाने बाहेर थांबलेल्या टीमला माहिती दिली. त्यानंतर घरावर छापा टाकून पाच जणांना जागीच पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करून सीमापुरी पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दुसऱ्या प्रकरणात काय घडलं?

तपासादरम्यान पोलिसांना कळले की ज्या घरात हे सेक्स रॅकेट चालत होते ती मुख्य आरोपी महिला आहे. याशिवाय या मुली नोएडा, मुस्तफाबाद आणि यमुना विहार येथील रहिवासी आहेत. आरोपी प्रिन्स हाही दिलशाद कॉलनीत राहतो. यापूर्वी दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील करकरडूमा येथील क्रॉस रिव्हर मॉलच्या स्पा सेंटरमध्येही धंदा सुरू होता. याची खबर मिळताच तेथे बनावट ग्राहक पाठवण्यात आला. खात्री झाल्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकून तरुणीसह दोघांना अटक करण्यात आली. स्पा सेंटरच्या रिसेप्शनवर आरोपींनी मसाजच्या नावाखाली बनावट ग्राहकाकडून पैसे उकळले. यानंतर आत असलेल्या तरुणीने त्याच्याकडे वेगळे पैसे मागितले. सध्या पोलीस याप्रकरणी स्पा सेंटर चालवणारी महिला आणि पंकज बब्बर नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पंकजच्या नावाने स्पा परवाना आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आनंद विहार पोलीस करत आहेत.

Video : बांधाच्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा; घटना कॅमेरात कैद

Pune crime | पुण्यात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी ; नेमकं काय घडलं

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.