Satara : मधमाशांनी हल्ला केल्यानंतर घाबरलेला युवक दरी कोसळला, शिलोबाच्या डोंगरावर यात्रेसाठी गेला होता

त्या परिसरात मधमाशा घोंगावत असल्यामुळे शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अखेर पीपीई किटच्या सहाय्याने युवकाला दरीतून वर काढण्यात यश आले आहे.

Satara : मधमाशांनी हल्ला केल्यानंतर घाबरलेला युवक दरी कोसळला, शिलोबाच्या डोंगरावर यात्रेसाठी गेला होता
मधमाशांनी हल्ला केल्यानंतर घाबरलेला युवक दरी कोसळला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2022 | 3:11 PM

सातारा – सातारा (Satara) शहरालगत असणाऱ्या शेरेवाडी (Sherewadi) या ठिकाणच्या शिलोबाच्या डोंगरावर यात्रेनिमित्त गेलेल्या युवकाचा मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात डोंगरावरून दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. सोमेश्वर विलास कदम (Someshwar Vilas Kadam) राहणार तारळे असे युवकाचे नाव असून संबंधित युवक हा शिवाजीनगर येथे मामाच्या गावाला यात्रेनिमित्त आला होता. आज सकाळच्या सुमारास सोमेश्वर हा त्याच्या नातेवाईकांसोबत शिलोबाच्या डोंगरावर यात्रेसाठी गेला होता यावेळी या डोंगरावर अचानक त्याच्यासह आणखी पाच जणांवर मधमाशांनी हल्ला केला यावेळी त्याने आपला जीव वाचवण्याच्या नादात तो दरीत कोसळला.

माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव

तरूण कोसळल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या मदतीने दरीतून त्याचा मृतदेह काढण्यात यश आले असून डोंगर परिसरात ज्या ठिकाणी घटना घडली. त्या परिसरात मधमाशा घोंगावत असल्यामुळे शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अखेर पीपीई किटच्या सहाय्याने युवकाला दरीतून वर काढण्यात यश आले आहे. इतर जखमींना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे संबंधित युवकाला बाहेर काढत असताना स्थानिक युवकांनी देखील ट्रेकर्स ला मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

navneet rana and ravi rana: नवनीत राणा आणि रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

Instagram : इंस्टाग्राम ‘ॲडीक्ट’ आहात?… आता स्वत:च सेट करा दिवसभराची टाइम लिमिट…

Khaire: कराडांना मंत्र्यांचे अधिकार तरी माहितयत का, सोमय्या शक्ती कपूरसारखा मिरवतो अन्…खैरेंची जीभ घसरली!