AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोपोलीत गगनगिरी आश्रमात चाललेल्या शाळेच्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला, केवळ दैव बलवत्तर म्हणून…

बसमध्ये एकूण 64 विद्यार्थी आणि 6 शिक्षक होते. जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून गगनगिरी आश्रम खोपोली येथे जात असताना शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये त्यांच्या बसचा ब्रेक फेल झाला.

खोपोलीत गगनगिरी आश्रमात चाललेल्या शाळेच्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला, केवळ दैव बलवत्तर म्हणून...
शाळेच्या बसला अपघातImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 06, 2023 | 3:52 PM
Share

खोपोली : एकविरा दर्शन आटोपून गगनगिरी आश्रमात दर्शनासाठी चाललेल्या शाळेच्या बसचा जुन्या मुंबई-पुणे घाटात ब्रेक फेल झाल्याने बस झाडावर आदळून अपघात झाल्याची घटना आज घडली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून बस दरीत कोसळता कोसळता वाचली. सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुखरुप आहेत. सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसची व्यवस्था करुन रवाना करण्यात आले. यानंतर अपघातग्रस्त बसला बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

डोंबिवलीतील शाळेची होती बस

डोंबिवली कोपर येथील च.रू. बामा म्हात्रे विद्यामंदिर या शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची सहल गेली होती. लोणावळ्यात एकविरा देवीचे आटोपून ही बस खोपोलीतील गगनगिरी आश्रमात दर्शनासाठी चालली होती.

बसमध्ये 64 विद्यार्थी होते

बसमध्ये एकूण 64 विद्यार्थी आणि 6 शिक्षक होते. जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून गगनगिरी आश्रम खोपोली येथे जात असताना शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये त्यांच्या बसचा ब्रेक फेल झाला. यामुळे बस झाडाला धडकून अपघात झाला.

सुदैवाने अपघातात कुणीही जखमी नाही

मात्र सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुखरुप आहेत. वेळ आली होती पण काळ आला नव्हता, म्हणूनच बस दरीत जाता जाता वाचली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?