अभिनेत्री दिशा पाटणी हिच्या घरी फायरिंग प्रकरणात धक्कादायक दावा, हत्या करण्याच्या उद्देश्यानेच ते आलेले,पण..

अभिनेत्री दिशा पाटणी हिच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणात तिच्या वडीलांनी आता मोठा दावा केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

अभिनेत्री दिशा पाटणी हिच्या घरी फायरिंग प्रकरणात धक्कादायक दावा, हत्या करण्याच्या उद्देश्यानेच ते आलेले,पण..
disha patani
| Updated on: Sep 14, 2025 | 10:02 PM

बॉलीवूडची अभिनेत्री दिशा पाटणी हीच्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील घरावर फायरिंग झाल्यानंतर नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांचा तपास पोलिस करकत आहे. या प्रकरणात दाखल एफआयआरमध्ये अभिनेत्री दिशा पाटणी हिच्या वडीलांना पोलिसांना या हल्ल्यातील महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील हल्लेखोरांचा हेतू नेमका काय होता याविषयी तर्कवितर्क केला जात आहे.

पोलीसांकडे केलेल्या तक्रारीत दिशा पाटणीचे वडील जगदीश सिंह पाटणी यांना सांगितले की १२ सप्टेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता घरातील पाळीव कुत्र्यांनी भूंकण्यास सुरुवात केली तेव्हा ते झोपेतून जागे झाले. जेव्हा ते बालकनीत आले तेव्हा घराबाहेर दोन जण बाईकवर होते. त्यांना त्यांची ओळख विचारली असता त्यातील एक गुंड म्हणाला मार दो इसे. त्यावेळी एक हेल्मेट नसलेल्या आणि बाईकवर बसलेल्या शुटरने पिस्तूल काढली. आणि त्याने आपल्यावर नेम धरुन गोळी झाडली. त्यावेळी आपण पटकन पिलरमागे लपून खाली झोपलो म्हणून आपले प्राण वाचल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिशा पाटणी हिच्या घरावर दोन वेळा हल्ला झाला आहे. पहिली घटना ११ सप्टेंबरच्या सकाळी ४.३३ वाजता आणि दुसरी घटना सकाळी ३.३० वाजता घडली आहे. परंतू पोलिसांना ११ सप्टेंबरच्या घटनेचे पुरावे मिळालेले नाहीत.

दिशा पाटणी हिच्या घरावर गोळीबार करण्याची जबाबदारी वीरेंद्र चारण गँगने घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत या गँगने म्हटले आहे की जय श्रीराम, मी वीरेंद्र चारण, महेंद्र सारण ( डेलाणा ), खुशबू पाटणी आणि दिशा पाटणी बहिणींच्या घरी आम्हीच फायरिंग केली आहे. त्यांनी आमचे पूज्य संत प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य जी महाराज यांचा अपमान केला आहे. त्यांनी आमच्या सनातन धर्माचा अपमान केला आहे.आमच्या आराध्य देवतांना अपमान सहन केला जाणार नाही. हा केवळ एक ट्रेलर आहे. पुढच्या वेळी आमच्या धर्माबद्दल असे केले तर घरातील कोणी जीवंत राहणार नाहीत,’ असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुलींची बाजू घेतली

दिशा पाटणी यांच्या वडीलांना मुलींची बाजू घेत सर्वांना आपली मते मांडण्याचा अधिकार आहे.अनिरुद्धाचार्य यांनी मुली २४ ते २५ वर्षांच्या होताच तोंड मारतात असा केलेला उल्लेख त्यांचा विचार होता. माझी मुलगी आर्मीमधली आहे, तिने सांगितले की कोणीही महिलांचा अपमान सहन करणार नाही असे त्यांनी सांगितले. दिशा पाटणी हीची बहिण खुशबू पाटणी यांनी सांगितले की तुम्ही असे कसे म्हणू शकता की महिला तोंड मारतात.आता फायरिंगनंतर तिने सांगितले की त्यांच्या वक्तव्याला तोडून – मोडून सादर केले गेले. आणि प्रेमानंद महाराज यांच्या वक्तव्याशी जोडले गेले.