ज्यांनी हे चित्र पाहिलं त्याचं काळीज फाटलं! ज्या घरात वरात यायची होती तिथे… एकाच घरातील सहा मुली…

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एकाच घरातील सहा मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे.

ज्यांनी हे चित्र पाहिलं त्याचं काळीज फाटलं! ज्या घरात वरात यायची होती तिथे... एकाच घरातील सहा मुली...
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 05, 2025 | 5:28 PM

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मंगळवारी एक दु:खद घडना घडली आहे. जिल्ह्यातील यमुना नदीत आंघोळ करताना सहा मुली बुडाल्या. त्यापैकी चार जणींचा जागीच मृत्यू झाला, तर दोघींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, नंतर त्यांनीही प्राण सोडले. एकाच कुटुंबातील सहा मृत्यूंमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये तीन सख्ख्या बहिणी, एक चुलत बहीण, एक मावस बहीण आणि एक नातेवाईक होती.

लग्नाचा आनंद शोकात बदलला

मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलीचे पुढील आठवड्यात लग्न होणार होते. म्हणजेच, ज्या घरात लग्नाची वरात येणार होती, त्या घराच्या अंगणात सहा मृतदेह आले आणि लग्नाचा आनंद शोकात बदलला. नातेवाइकांचे रडून-रडून हाल झाले आहेत. हे दृश्य पाहणाऱ्यांचेही काळीज फाटले आहे.

वाचा: ते वाचले असतील का? 25 दिवसांपूर्वीच लग्न झालं, हनीमूनला गेले अन् 1000 फूट खोल दरीत कोसळली कार; काय घडलं असेल?

पीडित कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर

आग्रा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पीडित कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना मृतांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

कसा झाला अपघात?

हा संपूर्ण प्रकार सिकंदरा पोलीस स्टेशन हद्दीतील नगला नाथू मौजा स्वामी येथील आहे. मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजता या सर्व मुली यमुना नदीत आंघोळीसाठी उतरल्या होत्या. आंघोळ करताना त्या खोल पाण्यात गेल्या. त्यामुळे एक-एक करत त्या बुडू लागल्या. मुलींचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस फोर्स यमुना किनाऱ्यावर पोहोचली. तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले, पण तोपर्यंत सर्व मुली बुडाल्या होत्या.