कर्ज फेडण्यासाठी नातेवाईकांच्या दागिन्यांवर डल्ला, तरुणाला अटक

| Updated on: Jun 23, 2021 | 12:08 PM

नागेशकोंची कोरवी यांनी घरात चोरी झाल्याची तक्रार प्रकरणी तक्रार सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशनला दिली होती. याबाबत तपास करताना नातेवाईक नातेवाईक तरुणाभोवती संशयाची सुई फिरली होती.

कर्ज फेडण्यासाठी नातेवाईकांच्या दागिन्यांवर डल्ला, तरुणाला अटक
सोलापुरात चोरट्याला अटक
Follow us on

सोलापूर : कर्जबाजारी झाल्यामुळे एका तरुणाने आपल्या नातेवाईकांच्या घरात चोरी केल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील सदर बाजार पोलिसांनी तरुणाला अटक केली. 50 तोळे चांदी, तर अर्धा तोळे सोन्याचे दागिने आरोपीकडून जप्त करण्यात आले. (Solapur man theft at relative’s house arrested)

सोलापूर शहरातील मौलाली चौकात राहणाऱ्या सुरज डेमबेर याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 50 तोळे वजनाची चांदीची देवीची मूर्ती आणि अन्य साहित्य, पाच ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज हस्तगत करण्यात आला.

सुरजभोवती संशयाची सुई

नागेशकोंची कोरवी यांनी घरात चोरी झाल्याची तक्रार प्रकरणी तक्रार सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशनला दिली होती. याबाबत तपास करताना नातेवाईक सुरजभोवती संशयाची सुई फिरली होती. मौलाली चौकामध्ये तो संशयास्पद पद्धतीने विविध साहित्य घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. कर्ज फेडण्यासाठी हा प्रकार केल्याचं त्याने पोलिस तपासात सांगितले आहे.

उन्हाळ्यात दार उघडं ठेवून झोपणं महागात

दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसात घराचं दार उघडं ठेवून झोपल्यामुळे चोरांनी चक्क मोबाईल-टीव्हीसह घर धुवून नेल्याचा प्रकार गेल्या महिन्यात सोलापुरात उघडकीस आला होता. विजापूर रोड येथे राहणारे शरणकुमार कणकी हे उन्हाळा असल्याने घरासमोरील गेट बंद करुन घराच्या बाहेर झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला. घरातील मोबाईल, टीव्ही, मिक्सर आणि इतर भांडी असा जवळपास चाळीस हजाराचा ऐवज चोरुन नेला होता.

स्मशानभूमी परिसरात गांजा पिताना अटक

याबाबतची फिर्याद त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत या चोरीचा तपास लावला. पोलिसांनी आरोपीची शोधाशोध सुरु केली, त्यावेळी यातील एक आरोपी स्मशानभूमी परिसरात गांजा पित बसला होता. त्याला त्यावेळी पकडल्यानंतर त्याच्या खिशात चोरीचा मोबाईल सापडला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या सर्व वस्तू हस्तगत केल्या

संबंधित बातम्या :

हाय प्रोफाईल लोकांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न, वकिलाच्या घरात शिरताच रंगेहाथ बेड्या

Video: दूध चोरीसाठी पुण्यात भलताच फंडा, रिक्षातून येणाऱ्या चोरट्याकडून साडे पाचशे लिटर दूध लंपास

उन्हाळ्यात मुख्य दार उघडं ठेवून झोपताय? चोरांनी मोबाईल-टीव्हीसह घर धुवून नेलं

(Solapur man theft at relative’s house arrested)